पुण्यात वक्ता प्रशिक्षण कार्यशाळेची सुरुवात!

    06-Jan-2024
Total Views | 30
Speaker Training Workshop in Pune
 
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दी दिनानिमित्त हर घर सावरकर समिती, विवेक व्यासपीठ आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने दि.६ आणि ७ जानेवारी रोजी वक्ता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी दि. ६ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता कार्यशाळेची सुरुवात सर्व प्रशिक्षणार्थींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन केली. यावेळी हर घर सावरकर समितीकडून अनंत पणशीकर यांनी प्रास्ताविक आणि कार्यशाळेची भूमिका मांडली.

यावेळी समितीचे विद्याधर नारगोळकर ,यशवंत अकोलकर ,रोहन अंबिके, प्रशांत चव्हाण, देवव्रत बापट, अश्विनी कुलकर्णी, निखिल कुलकर्णी, ॲड. गौरी कुलकर्णी यांसह ८० हून अधिक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. तसेच सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने, निवेदिका अर्चना साने यांनी सकाळच्या सत्रात सावरकर साहित्याचा अभ्यास आणि सादरीकरण ह्या विषयावर मार्गदर्शन केले.

तसेच अन्य सत्रांमध्ये दुर्गा सावंत ,ओंकार ठोसर, सुमेध बागाइतकार,तुषार दामगुडे आदी आणि मार्गदर्शक केले. विशेष म्हणजे सावरकर आक्षेप आणि खंडन या विषयावरती सावरकर अभ्यासक अक्षय जोग यांनी प्रशिक्षणार्थींना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच यावेळी भाजप माजी खासदार तथा भांडारकर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्रदिपदादा रावत यांनी ही प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121