राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेत बँक ऑफ बडोदा, पी.डी.हिंदुजा, शिवशक्तीची विजयी सलामी

    03-Feb-2024
Total Views | 42
State Level Workers Kabaddi Competition

मुंबई  : 
राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेत पहिल्या दिवशी साखळी सामन्यांमध्ये बँक ऑफ बडोदा, पी.डी.हिंदुजा, स्नेहविकास, शिवशक्ती या संघांनी विजयी सलामी दिली आहे. पुरुष शहर विभागात पी.डी.हिंदुजा वि. रुद्रा असोसिएट्स यांच्यात चुरशीची लढत झाली. हिंदुजाने रुद्रावर ८ गुणांनी मात करत आपले वर्चस्व सिद्ध केले. पी.डी.हिंदुजाच्या प्रथमेश वेके, निखिल पाटील यांनी खोलवर चढाई करत हा विजय खेचून आणला. बँक ऑफ बडोदा वि.माटुंगा वर्कशॉप यांच्यात १२ गुणांच्या फरकासह एकतर्फी सामना बघायला मिळाला. बँक ऑफ बडोदाच्या ऋतिक पाटीलची चढाई व नितीन पाटीलच्या पकडी लक्षवेधी ठरल्या. या सामन्यात माटुंगा वर्कशोपच्या हर्षद जळगावकर केलेले शर्तीचे प्रयत्न अपुरे पडले.

महिला शहर बाद फेरीच्या सामन्यात स्नेह विकास वि. जिजामाता यांच्यातील सामना रोमहर्षक झाला. सुरवातीच्या काही मिनिटात जीजामाताने स्नेहविकासवर गुणांची आघाडी घेत सामन्यावर पकड मजबूत केली होती. त्यावर स्नेहविकासच्या सोनाली पाटीलने केलेली आक्रमक चढाई व प्राची तानवडेने दिलेल्या कडव्या झुंजीमुळे जिजामाताला ७ गुणांनी पराभव पत्करावा लागला. धुळ्याच्या शिवशक्ती वि. कणकवलीच्या जय महाराष्ट्र यांच्यातील सामना शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीचा ठरला. शिवशक्तीने शेवटच्या काही मिनिटात जय महाराष्ट्रच्या कोमल रणसिंगला बाद करीत सामना फिरवला व ३ गुणांच्या फरकाने विजयश्री खेचून घेतली. शिवशक्तीच्या विद्या डोलताडेने केलेली उत्कृष्ट चढाई व पूजा कदमची पकड या सामन्यात निर्णायक ठरली.

इतर निकाल पुढीलप्रमाणे -

पुरुष शहर (साखळी सामने) - रुपाली ज्वेलर्स वि.वि.माझगाव डॉक ५२-३२,

महिला शहर(बाद फेरी) - जय भारत स्पो.क्ल. वि.वि. विश्वशांती २५-२०, गोल्फादेवी प्रतिष्ठान वि.वि. माउली प्रतिष्ठान ३५-३१, होतकरू ठाणे वि.वि. जे.जे. हॉस्पिटल ४०-२८, अमरहिंद वि.वि.जय अंबे ४४-३७, जय महाराष्ट्र कुडाळ वि.वि.हनुमान क्री.मं. यवतमाळ ३३-२१.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121