धक्कादायक! तेंडुलकरचा डीप फेक व्हीडिओ व्हायरल!, सचिन म्हणाला, "हे प्रकरण..."

    15-Jan-2024
Total Views |
Sachin Tendulkar Deep Fake Video Viral

मुंबई :
भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा डीप फेक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याआधी अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीप फेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता सचिन तेंडूलकरचा डीप फेक व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे पुन्हा एकदा प्रगत तंत्रज्ञानाच्या वापराबाबत प्रश्चचिन्ह निर्माण झाला आहे. सचिनने यासंदर्भात "X"वर पोस्ट करत डीपफेकचा गैरवापर थांबवता यावा यासाठी ठोस भूमिका घेणे खूप महत्त्वाचे आहे, असे म्हटले आहे.


दरम्यान, सचिन तेंडूलकरचा डीप फेक झालेला व्हायरल व्हिडीओतील आशय हा ऑनलाईन गेमिंगला प्रोत्साहन देणार आहे. या व्हिडीओत सचिन स्कायवर्ड एविएटर गेमचे प्रमोशन करताना दिसून येत आहे. ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून पैसे कमावण्याचे आव्हान या व्हिडीओतून करण्यात येत आहे.

सचिन तेंडूलकरने या सर्वप्रकारावर "X"वर पोस्ट करत सदर व्हिडीओ हा खोटा असून डीप फेक व्हिडीओ करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. सचिनने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, हा व्हिडिओ बनावट असून तुम्हाला फसवण्यासाठी बनवला आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर करण्याचा हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे. आपणा सर्वांना विनंती आहे की असे व्हिडिओ किंवा अॅप्स किंवा जाहिराती दिसल्यास त्वरित कळवा.