दिवसअखेर भारताकडे १७१ धावांची आघाडी; इंग्लंडच्या पहिला डावात २५३ धावा

    03-Feb-2024
Total Views |
ind vs eng 2nd test india lead by 171 runs

नवी दिल्ली :
भारत विरुध्द इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणम येथे खेळविण्यात येत आहेत. भारताने पहिल्यांदा नाणेफेक जिंकत फंलदाजीचा निर्णय घेत ३९६ धावा केल्या. सलामीवीर यशस्वी जयस्वालने द्विशतक झळकावून इतिहास रचला. तसेच, इंग्लंडकडून गोलंदाज अँडरसन, बशीर आणि अहमद यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. तर इंग्लंडने पहिल्या डावात फक्त २५३ धावाच केल्या यात सर्वाधिक जॅक क्राव्हलीने ७८ चेंडूत ७६ धावांची खेळी केली.


दरम्यान, भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ६ विकेट्स घेत इंग्लंडला पिछाडीवर ढकलले. त्यामुळे भारताला दुसऱ्या सामन्यात १४३ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. दुसऱ्या डावाची सुरूवात करताना सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार रोहित शर्मा अनुक्रमे १५ व १३ धावांवर नाबाद आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपताना भारताने बिनबाद २८ धावा काढल्या आहेत.