भाजप नेते अतुल शाहांकडून राम मंदिरावर आधारित गाण्याची निर्मिती

    18-Dec-2023
Total Views |
Song on Shri ram mandir

मुंबई :
भाजप नगरसेवक अतुल शाह यांच्या पुढाकारातून राम मंदिराच्या उद्घाटनावर गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. या गाण्याचे लवकरच प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, सदर गाण्याचा टीझर शेअर करण्यात आला आहे. पुढील वर्षी २२ जानेवारी रोजी राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.

दरम्यान, नगरसेवक अतुल शाह ह्यांनी सर्वप्रथम वेक्सिनेशन वर गाण्याची निर्मिती केली त्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, त्यानंतर हर घर तिरंगा, घर घर तिरंगा ह्यावर ही गाण्याची निर्मिती केली त्याचे उद्घाटन माजी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केले, त्यानंतर चांद्रयानाच्या यशस्वी उड्डानावर गाण्याची निर्मिती केली त्याचे उद्घाटन मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी केले होते.