BMC Election : काँग्रेसला युतीसाठी कधीही प्रस्ताव दिला नव्हता, वर्षाताईंनी तोंडाला आवर घालावा!

    17-Nov-2025   
Total Views |
mns vs congress
 
मुंबई : आगामी मुंबई महापालिका (BMC Election) निवडणुकीच्या तोंडावरच मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्यात चांगलाच शाब्दीक वाद रंगला आहे. मनसेच्या कार्यशैलीवर खासदार वर्षा गायकवाड यांनी टीका केली होती. आता याच टीकेवर देशपांडे  यांनी गायकवाडांना तोंडाला आवर घालण्याचा सल्ला देत टोला लगावलाय. (BMC Election)
 
वर्षा गायकवाडांची टीका काय होती?
 
मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी नाव न घेता मनसेवर टीका होती. त्या म्हणाल्या... काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही मुंबई महापालिका निवडणुका (BMC Election) स्वबळावर लढणार आहोत. म्हणत त्यांनी काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
काही पक्षांची भाषा त्यांची वर्तणूक पटत नाही.. त्यांची वर्तणूक आमच्या संस्कृतीला साजेशी नाही.. आम्ही शिवसेनेच्या विरोधात नाही मात्र ते ज्यांच्यासोबत जातायंत त्यांच्याशी आमची विचारधारा पटणारी नाही... गरिबांना मारणाऱ्यांना, हुकूमशाही करणाऱ्यांसोबत आम्ही जाणार नाही, असं गायकवाड (Varsha Gaikwad) म्हणाल्या.
 
संदीप देशपांडे काय म्हणाले?
 
काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची त्यांची भूमिका मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी स्पष्ट केली, यावरच आता मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी काँग्रेसला टोला लगावलाय. देशपांडे म्हणाले की, काँग्रेसचा इतिहास काय आहे, हे सर्वांना माहीत आहे. काँग्रेसने कोणाला मारले, कोणाला झोडले, कोणाला ठेवले, हा सर्व काँग्रेसचा इतिहास आहे. त्यामुळे वर्षाताईंनी (Varsha Gaikwad) तोंडाला आवर घालावा, असं ते म्हणाले.
काँग्रेसने मारहाण करणाऱ्या पक्षासोबत युती करणार नसल्याच्या वक्तव्यावर देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले की, मुळात आम्ही काँग्रेसला कधीही युतीचा प्रस्ताव दिला नव्हता. ना काँग्रेसने आम्हाला युतीचा प्रस्ताव दिला होता. त्यामुळे युती संदर्भातील या सर्व चर्चा वायफळ असल्याचं देशपांडे म्हणाले. बिहार विधानसभा निवडणुकीतील अपयशावरून काँग्रेसने दुसऱ्यांना दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करावे, असा सल्लाही देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी दिला.

दिनेश दानवे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून पदवी आणि मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे येथून पत्रकारिता अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. डिजिटल आणि सोशल मीडिया हाताळण्याचा अनुभव असून राजकारण, मनोरंजन आणि शेती या विषयांमध्ये विशेष रस आहे. प्रिंट आणि डिजिटल माध्यमांमध्ये इंटर्नशिपचा अनुभव घेतला असून सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत.