मुंबई : आगामी आयपीएल २०२४ मोसमाकरिता बीसीसीआयकडून ११६६ खेळाडूंची नोंदणी करण्यात आली आहे. याआधी प्रत्येक संघाकडून आपल्याला खेळाडूला रिटेंशन करण्यात आले आहे. तर काही खेळाडूंना संघांकडून रिलीज करण्यात आले आहे. त्यानंतर आता एकूण ११६६ खेळाडूं लिलावाकरिता सज्ज झाले आहेत. आयपीएल संघमालक येत्या १९ डिसेंबरला आपल्या संघासाठी खेळाडूंना विकत घेणार आहेत.
दरम्यान, ११६६ खेळाडूंपैकी कोणत्या खेळाडूला किती बोली लागते आणि कुठल्या संघात त्यांना स्थान मिळते याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष असणार आहे. आयपीएल २०२४ साठी लिलावासाठी तयारी पूर्ण झाली असून एकूण ११६६ खेळाडूंची नोंद करण्यात आली आहे. यात ८३० खेळाडू हे भारतीय आहेत. त्यात २१२ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.