हुतात्मा अनंत कान्हेरेंचे स्मरण करीत ठाणे कारागृहात पवित्र मातीला नमन!

"मेरी मिट्टी, मेरा देश"मध्ये भाजपाचा उपक्रम

    09-Aug-2023
Total Views |
Hutatma Anant Kanhere Remembered In Thane Jail

ठाणे
: स्वातंत्र्यलढ्यात हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्यवीर अनंत कान्हेरे यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या ठाणे कारागृहातील पवित्र मातीला वंदन करीत भाजपा कार्यकर्त्यांनी अनंत कान्हेरेंबरोबरच भारतमातेचा जयजयकार केला.`मेरी मिट्टी, मेरा देश' उपक्रमांतर्गत भाजपातर्फे पवित्र माती कलशात घेऊन नमन करण्यात आले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष व माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले व आ. निरंजन डावखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम करण्यात आला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात `मेरी मिट्टी, मेरा देश' हा उपक्रम आजपासून राबविण्यास सुरूवात झाली आहे. भाजपातर्फे ठाणे कारागृहात उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अवघ्या १८ वर्षांच्या अनंत कान्हेरे यांना ठाणे कारागृहात १९१० मध्ये फाशी झाली होती. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यासाठी `मिट्टी को नमन, वीरों को वंदन' हा कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमात ठाणे कारागृहातील पवित्र माती कलशात घेण्यात आली. तसेच मातीला वंदन करण्यात आले. या वेळी माजी नगरसेवक संदीप लेले, माजी नगरसेविका नम्रता कोळी, नंदा पाटील, माजी नगरसेवक सुनेश जोशी, सुनील हंडोरे, सरचिटणीस कैलास म्हात्रे, मनोहर सुखदरे, चिटणीस जयेंद्र कोळी, भाजयुमोच्या कोकण मा. सहसंयोजिका वृषाली वाघुले-भोसले, विक्रम भोईर, मंगेश आवळे, निलेश पाटील, हिरोज कपोते, नरेश पवार, विजय रेडकर, सचिन पाटील, नताशा सोनकर आदींसह पदाधिकारी, विविध आघाडीचे संयोजक आदींची उपस्थिती होती.







अग्रलेख
जरुर वाचा