मुंबई: औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन व बांधकाम क्षेत्रातील उभारीनंतर आता सेवा क्षेत्रात बरेपैकी वाढ होण्याची शक्यता आहे. तसे संकेत एका अहवालाने दिले आहेत.सेवा क्षेत्रात विविध कंपन्यांच्या सेवा जसे की टेलिफोन, मिडिया, कन्सल्टन्सी,आरोग्य, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान अशा विविध सुविधा येतात. ५ मार्चला दर्शविण्यात आलेल्या अहवालात म्हटल्याप्रमाणे सेवा क्षेत्रात महागाईचा आकडा कमी होत मागील काळाच्या तुलनेत यंदा सेवा क्षेत्रातील वाढ कायम राहणार नाही. अत्यंत वेगाने नसली तरी चांगल्या प्रकारे सेवेत वाढ होण्याची शक्यता आहे.
'द एचएसबीसी इंडिया सर्विसेस परचेसिंग मॅनेजर' निर्देशांकात जानेवारीत सहा महिन्यांतील दरवाढीचा आकडा सर्वाधिक ६१.६ होता जो फेब्रुवारीत ६०.६ अंशापर्यंत घसरला होता. मात्र तो आवश्यक त्या ५० अंशाने अधिक राहिला होता. आता भविष्यातील काळात सेवा क्षेत्रातील वाढ होऊ शकते असे या अहवालात म्हटले गेले आहे.
भारताचा जीडीपी ८.४ टक्क्याने वाढू शकतो याचे अनुमान या आठवड्यात सरकारी आकडेवारीनुसार जाहीर करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर एचएसबीसी अर्थतज्ज्ञाने म्हटल्याप्रमाणे, 'नव्या मागणीतील थोडी घट झाल्याने सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या नवीन मागण्यांमध्ये घट होऊ शकते. परंतु सेवा क्षेत्रातील व्यवसाय मात्र मजबूत स्थितीत राहणार आहे. फेब्रुवारीमध्ये सेवा निर्देशांकात सहा महिन्यांतील घट दर्शवली गेली होती. पण गेल्या अडीच वर्षातील मागणीतील वाढ पाहता ऑफशोअर मागणीत मात्र सकारात्मक बाजू व्यापारात दिसत आहे.
या नव्या आकडेवारीत एक नकारात्मक बाजू म्हणजे पुढील १२ महिन्यात व्यवसायात वाढ होणारी असली तरी नोव्हेंबरच्या तुलनेत ती नसणार आहे असा अंदाज आहे. सेवा क्षेत्रातील नोकरी भरती व रोजगारात मध्ये घट झाली असली तरी मात्र थोड्या प्रमाणात मात्र वाढ झाली आहे. महागाईचा दबाव कमी झाला तरी डिसेंबर महिन्यातीत उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे ही वाढ तुलनेत कमी होईल. गेल्या २ वर्षात वस्तूंच्या किमती हळूहळू वाढल्यामुळे विक्री किंमतीत त्या तुलनेत वाढ झाली आहे.' असे म्हटले आहे.
सध्याच्या घडीला सेवा क्षेत्राची महती वाढत आहे. भारतातील एकूण व्यवसायातील ३० टक्के नोकरीच्या संधी या सेवा क्षेत्रात निर्माण होतात. आगामी काळात शहरी व निमशहरी भागात सोबत ग्रामीण भागातील सेवा क्षेत्रातील संधी वाढू शकतील.