राजस्थान : 'द काश्मिर फाईल्स'मुळं काँग्रेस सरकारनं लावलं कलम १४४

    22-Mar-2022
Total Views |
 
 
           
kashmir files  
 
जयपूर: राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात काश्मीर फाइल्स या चित्रपटाच्या सादरीकरणामध्ये अडचणी निर्माण होऊ नये म्हणून जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. काश्मिरी पंडितांबद्दलचे सत्य सांगणाऱ्या काश्मीर फाइल्स या चित्रपटाला अडथळे तयार करून राज्यातील काँग्रेस सरकार अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण यातून करत आहे असे दिसते. कोटा जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश काढून २२ मार्च ते २१ एप्रिल या दरम्यान ही जमावबंदी लागू राहील असे आदेश काढले आहेत. या काळात येणाऱ्या सर्व सण- उत्सवांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या आदेशांबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सविस्तर पत्रक काढण्यात आले आहे.
 
 
काश्मीर फाइल्स या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या निर्बंधांना विरोध दर्शवला आहे. या प्रकरणी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. भाजपचे आमदार रामलाल शर्मा यांनी या बद्दल राजस्थान सरकारवर जोरदार टीका केली आहे. "या आदेशातून राजस्थान सरकारची बौद्धिक दिवाळखोरीच दिसून येते. कोटा मध्ये कलम १४४ लागू करून सरकार काय दाखवू इच्छित आहे? सरकारच्या कालच्या दर्जाच्या मानसिकतेचे दर्शनच यातून घडून येते आहे" असे रामलाल शर्मा यांनी राजस्थान सरकारवर टीका करताना केले आहे.
 
 
अग्रलेख