NEET Exam Cancelled 2026: NEET रद्दचा धक्कादायक खुलासा: ६० लाखांत उत्तीर्ण करण्याची हमी, ‘सॉल्व्हर गँग’चे देशभर जाळे?

Total Views |
 
NEET Exam Cancelled 2026
 
देशभरातील वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी सर्वात महत्त्वाची मानली जाणारी यंदाची नीट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. एनटीए म्हणजे नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून ३ मे रोजी घेण्यात आलेली NEET परीक्षा १२ मे २०२६ रोजी अधिकृत निवेदन जारी करून रद्द करण्यात आली असून,परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असंही सांगण्यात आलंय. पण या निर्णयामागचं कारण आणखी धक्कादायक आहे. पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे की, काही ठिकाणी संघटित टोळी उमेदवारांना उत्तीर्ण करून देण्याच्या नावाखाली तब्बल ५० ते ६० लाख रुपये उकळत होती. सुरुवातीला १.५ ते २ लाख रुपये आगाऊ घेतले जात आणि त्यानंतर खऱ्या उमेदवाराच्या जागी परीक्षा केंद्रावर ‘डमी कॅंडिडेट’ बसवण्याची तयारी केली जात होती. मात्र आता या पेपरफुटी प्रकरणाचं कनेक्शन थेट नाशिकशी असल्याचं उघड होताय. पण ते कनेक्शन नेमकं काय आहे? या प्रकरणातील आरोपी कोण आहेत? आणि नीटच्या परिक्षेचं पुढील नियोजन कसं असणार आहे? (NEET Exam Cancelled 2026)
 
एनटीएने केंद्र सरकारच्या परवानगीने आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या शिफारशींनुसार घेतलेल्या या निर्णयामुळे देशभरातील २२.७९ लाख विद्यार्थ्यांमध्ये भीतीच वाटावरण निर्माण झालं असलं, तरी एनटीएने आश्वासन दिले आहे की, कोणत्याही विद्यार्थ्याला पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. मे २०२६ सत्रासाठीची नोंदणी माहिती, उमेदवारी, परीक्षा केंद्रे आणि भरलेले शुल्क यापैकी काहीही बदलणार नाही. शिवाय आधीच भरलेले शुल्क परतही केले जाईल आणि एनटीएच्या अंतर्गत संसाधनांचा वापर करून नवीन परीक्षा लवकरच घेतली जाईल. (NEET Exam Cancelled 2026)
 
हेही वाचा: नीट पेपरफुटी प्रकरणाचं नाशिक कनेक्शन उघड, बीएएमएसच्या विद्यार्थाला अटक, नाशकातून पेपर देशभरात 
 
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने तपासाची जबाबदारी CBI कडे सोपवली आहे. एनटीएने तपासासाठी सर्व कागदपत्रे आणि माहिती देण्याची तयारी दर्शवली असून, देशातील सर्वात मोठ्या परीक्षा प्रक्रियेतील या गैरप्रकाराचा छडा लावण्यासाठी केंद्रीय यंत्रणा सक्रिय झाली आहे. (NEET Exam Cancelled 2026)
 
पेपर लीकच्या आरोपांप्रमाणे, ३ मे रोजी होणारा NEET पेपर १ मे रोजीच फुटल्याची माहिती समोर आली होती. सोशल मीडियावर, विशेषतः टेलिग्राम ग्रुप्स आणि इन्स्टाग्रामवर प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका व्हायरल झाल्याचे दावे केले जात होते. काही अहवालांनुसार, एका 'गेस पेपर'मध्ये ७२० पैकी सुमारे ६०० गुणांचे प्रश्न NEET च्या मुख्य पेपरशी जुळत असल्याचे आढळले, ज्यामुळे ६०० पैकी गुण आरामात मिळवता आले असते. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रश्न जुळणे ही केवळ योगायोगाची बाब तर असूच शकत नाही. (NEET Exam Cancelled 2026)
 
राजस्थानमधील सीकरसारख्या भागातील कोचिंग संस्था आणि सल्लागारांशी या प्रकरणाची जोड असल्याचे संशय व्यक्त होत आहेत, तर हरियाणा, आंध्र प्रदेश, बिहार आणि जम्मू-काश्मीरपर्यंत पेपर सेट्स पसरल्याच्या चर्चा सुरू आहेत. नाशिक कनेक्शनबाबतही प्राथमिक माहिती समोर आली असून, नाशिक गुन्हे शाखेने एका ३० वर्षीय BAMS च्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे, जो मेडिकल काउन्सेलिंग एजन्सी चालवत असल्याची माहिती आहे. या आरोपीने ओळख लपविण्यासाठी केस कापली होती. मात्र क्राईम ब्रांच टीमने आरोपीला ओळखले आणि तत्काळ ताब्यात घेतले. (NEET Exam Cancelled 2026)
 
नाशिकमध्येच NEET प्रश्नपत्रिका छापल्या गेल्याची माहिती असून, तिथूनच पहिला सेट हरियाणात पाठवला गेल्याचा आणि नंतर १० वेगवेगळे सेट देशभर पसरवले गेल्याचा दावा केला जात आहे. राजस्थान पोलिसांच्या माहितीनुसार नाशिक क्राईम ब्रांचने हा संशयित ताब्यात घेतला असून, आणखी ७ आरोपींवर कारवाई सुरू आहे. या प्रकरणाने परीक्षा प्रक्रियेच्या सुरक्षेवर, छपाई युनिट्सवर आणि वितरण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. (NEET Exam Cancelled 2026)
 
हे वाचलात का?:  NEET UG 2026 Cancelled: NEET परीक्षा रद्द! पेपरफुटीची सीबीआय चौकशी..., पुन्हा परीक्षा कधी होणार?
 
दरम्यान, बिहारमध्ये एक 'सॉल्व्हर गँग' सक्रिय असल्याचे समोर आले आहे, जी एका सीटसाठी ६० लाख रुपये आकारत होती. नालंदा पोलिसांनी एमबीबीएसच्या एका विद्यार्थ्याच्या नेतृत्वाखालील या टोळीतील सात जणांना अटक केली आहे. चौकशीदरम्यान, आरोपीने कबूल केले की परीक्षेपूर्वी सूत्रधाराला दीड ते दोन लाख रुपये आगाऊ रक्कम देण्यात आली होती. उमेदवारांना उत्तीर्ण होण्यास मदत करण्यासाठी ५०-६० लाख रुपयांचे सौदे निश्चित करण्यात आले होते. या टोळीत उज्ज्वल राज उर्फ ​​राजा बाबू, अवधेश कुमार आणि अमन कुमार सिंग यांनी प्रमुख भूमिका बजावली. (NEET Exam Cancelled 2026)
 
यापूर्वी २०२४ मध्येही, पेपरफुटीमुळे काही केंद्रांवर नीट यूजी परीक्षा रद्द करण्यात आली होती. या परीक्षा ५ मे २०२५ रोजी घेण्यात आल्या होत्या. ६ मे रोजी, एनटीएने पेपरफुटीचे आरोप फेटाळून लावले. यानंतर, बिहार आणि झारखंड येथे तपास करण्यात आला. तपासात पेपरफुटीचे पुरावे सापडले आणि अनेक अटकही करण्यात आल्या. (NEET Exam Cancelled 2026)
 
तथापि, सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण परीक्षा रद्द करण्यास नकार दिला आणि काही केंद्रांवर १,५३९ उमेदवारांसाठी फेरपरीक्षा घेण्यात आली. पेपरफुटीच्या आरोपांव्यतिरिक्त, ७२० पैकी ७२० गुण मिळवणारे ६७ विद्यार्थी आणि एकाच केंद्रातून आलेले अनेक टॉपर हेदेखील एक मोठे वादाचे कारण ठरले होते. (NEET Exam Cancelled 2026)
 
या सर्व घडामोडींमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य सध्या अनिश्चिततेत आहे. एकीकडे वर्षभराची मेहनत वाया जाण्याची भीती, तर दुसरीकडे पुन्हा परीक्षा देण्याचा ताण. अशा दुहेरी संकटाचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. (NEET Exam Cancelled 2026)
 
आता सर्वांचे लक्ष नव्या परीक्षेच्या तारखांकडे आणि तपासाच्या निष्कर्षांकडे लागले आहे. या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, देशातील परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींवरही आता गंभीरपणे विचार करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. (NEET Exam Cancelled 2026)




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com