NEET UG 2026 Cancelled: NEET परीक्षा रद्द! पेपरफुटीची सीबीआय चौकशी..., पुन्हा परीक्षा कधी होणार?

Total Views |


 
NEET UG 2026 Cancelled
 
मुंबई: (NEET UG 2026 Cancelled) देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली NEET (UG) 2026 परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NTA) ने मंगळवारी १२ मे रोजी अधिकृत निवेदन जारी करत ३ मे २०२६ रोजी होणारी परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला. पेपरफुटीच्या आरोपांमुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, परीक्षेची पारदर्शकता आणि विश्वासार्हता टिकवण्यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे एनटीएने स्पष्ट केले आहे. (NEET UG 2026 Cancelled)
 
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, केंद्र सरकारने ते केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. तपासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याबरोबरच सर्व आवश्यक कागदपत्रे आणि नोंदी पुरवण्याचे आश्वासन एनटीए कडून देण्यात आले आहे. (NEET UG 2026 Cancelled)
 
पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही...

एनटीएकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, मे २०२६ च्या सत्रासाठी निवडलेली नोंदणी माहिती, उमेदवारी आणि परीक्षा केंद्रे पुनर्निर्धारित परीक्षेसाठी पुढे नेली जातील. नवीन नोंदणीची आवश्यकता नाही आणि कोणतेही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. याव्यतिरिक्त, आधीच भरलेले शुल्क विद्यार्थ्यांना परत केले जाईल आणि NTA च्या अंतर्गत संसाधनांचा वापर करून परीक्षा पुन्हा घेतली जाईल. (NEET UG 2026 Cancelled)
 

पुन्हा परीक्षा कधी होणार?
 
एनटीएने सांगितले की, तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीमुळे सध्याची परीक्षा प्रक्रिया सुरू ठेवणे शक्य नव्हते. केंद्रीय तपास यंत्रणांच्या अहवालांनुसार, प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने परीक्षा रद्द करणे हाच योग्य पर्याय होता. ३ मे २०२६ रोजी होणारी नीट यूजी परीक्षा आता रद्द करण्यात आली असून, परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. (NEET UG 2026 Cancelled)
 

 





मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com