नाशिक : (NEET Exam Irregularities) पेपरफुटीमुळे वादात सापडलेली नीट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं हा निर्णय घेतल्यानंतर देशभरात खळबळ उडालेली असतानाच, य़ा गंभीर प्रकरणाचं नाशिक कनेक्शन समोर आलंय. नीट पेपरफुटी प्रकरणात नाशिकमधील एका तरुणाला अटक करण्यात आलीय. हा तरुण बीएएमएसचा विद्यार्थी असल्याची माहिती असून त्याची मेडिकल कौन्सिलिंग एजन्सी असल्याचीही प्राथमिक माहिती आहे.(NEET Exam Irregularities)
पेपरफुटी नाशिकमधून झाल्याचा संशय
नीटच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका या नाशिकमध्ये छापण्यात आल्याची माहिती आहे. या ठिकाणाहूनच नीटचा पहिला पेपर बाहेर काढण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. त्यानंतर प्रश्नपत्रिका हरियाणात पाठवली गेल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. हरियाणाच या प्रश्नपत्रिकेचे १० वेगवेगळे सेट तयार करुन ते आंध्र प्रदेश, बिहार, जम्मू काश्मीरपर्यंत पाठवले गेल्याची माहिती आहे. ही पेपटफुटी समोर आल्यानंतर परीक्षा घेणाऱ्या संस्था आणि याबाबतच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करण्यात येतंय.(NEET Exam Irregularities)
२२.७९ लाख विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागणार परीक्षा
३ मे रोजी नीट परीक्षा घेण्यात आली होती, देशभरातून या परीक्षेसाठी २२.७९ लाख विद्यार्थी बसले होते. पेपरफुटी झाल्याचं समोर आल्यानंतर केंद्र सरकारच्या परवानगीनं परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं घेतलाय़. केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवला आहे. नव्यानं होणाऱ्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.(NEET Exam Irregularities)
ABVP strongly opposed the NEET-UG 2026 irregularities from the very beginning and demanded strict action.
Students’ future is not a game. No compromise on justice. No compromise on transparency. 🚩
३ मे रोजी झालेली परीक्षा रद्द झाल्यानं देशभरातली परीक्षार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. वर्षभरातील कठोर परीश्रमानंतर पुन्हा परीक्षा द्यावी लागणार असल्यानं विद्यार्थ्यांना आता पुन्हा परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. परीक्षार्थींना पुन्हा नोंदणीची आवश्यकता नसल्याचं आणि परीक्षा केंद्रही कायम राहणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. परीक्षेसाठी कोणतेही नवे शुल्क आकारण्यात येणार नसलं तरी विद्यार्थांना नवं ओळखपत्र देण्यात येणार आहे.(NEET Exam Irregularities)