_202605121420224748_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
अमेरिका-इराण तणावामुळे तेल संकट अधिक गडद होत चाललं आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता वाढत असून, त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवर आणि आयातीवर होऊ शकतो. त्यामुळे देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी अशा प्रकारच्या सूचनांकडे लक्ष दिलं जात आहे. (Gold Reserve Countries List)
जागतिक स्तरावर सोन्याचा साठा कोणत्या देशाकडे किती आहे, यावर नजर टाकली तर काही मोठी अर्थव्यवस्था आघाडीवर दिसतात. (Gold Reserve Countries List)
अमेरिका - पहिला क्रमांक
सर्वाधिक सोन्याचा साठा युनायटेड स्टेट्सकडे आहे. अनेक वर्षांपासून अव्वल स्थान कायम
साठा: ८,१३३.५० टन
जर्मनी - दुसरा क्रमांक
सातत्याने वाढणारा साठा.
साठा: ३,३५१.५ टन
इटली - तिसरा क्रमांक
साठा: २,४५२ टन
फ्रान्स - चौथा क्रमांक
साठा: २,४३७ टन
रशिया - पाचवा क्रमांक
साठा: २,३३३ टन
चीन - सहावा क्रमांक
साठा: २,३०३.५ टन
स्वित्झर्लंड - सातवा क्रमांक
साठा: १,०३९.९० टन
भारत - आठवा क्रमांक
साठा: ८८०.१३ टन
सोनं खरेदी टाळण्यामागचं कारण काय?
सध्या जगभरात तेल संकट तीव्र होत आहे. महागाई वाढण्याची शक्यता आहे. त्यात डॉलर आणि जागतिक बाजारात अस्थिरता. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर सोन्याची आयात केल्यास देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या आवाहनाचा उद्देश आर्थिक संतुलन राखणे हा असू शकतो. (Gold Reserve Countries List)
भारतामध्ये लग्नसमारंभ, सण आणि गुंतवणूक यासाठी सोन्याची मोठी मागणी असते. ज्यामुळे मोठ्याप्रमाणावर सोन्याची आयात केली जाती. जर खरेदी कमी झाली तर, आयात कमी होईल, चालू खात्याचा तुटवडा (CAD) कमी होऊ शकतो. त्यासोबतच, रुपयावरचा दबावही कमी होईल. (Gold Reserve Countries List)