सलग दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं इंधनबचतीचं आवाहन! म्हणाले, वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन क्लास आणि खाद्यतेलाच्या कमी वापर करा!

    11-May-2026
Total Views |

Narendra Modi (1)


नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग दुसऱ्या दिवशी इंधनबचतीचे आवाहन केले आहे, गुजरातच्या वडोदरा येथे सरदारधाम वसतीगृहाचे उद्घाटनप्रसंगी त्यांनी आपल्याच भाषणाचा पुर्नरुच्चार त्यांनी केला आहे. सोन्याच्या खरेदीची गरज नसल्याचे सांगत त्यांनी पुन्हा एकदा युद्धजन्य स्थितीचा हवाला देत एक एक करुन संकल्प घेण्याचे आवाहन केले आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “भारताच्या आयातीचा मोठा हिस्सा कच्चे तेल आहे. दुभाग्य म्हणजे भारताला जिथून कच्चे तेल मिळते तेच क्षेत्र युद्धजन्य स्थितीचा सामाना करत आहे. त्यामुळेच जोपर्यंत परिस्थिती मावळत नाही, तोपर्यंत आपल्याला छोटे-छोटे संकल्प घ्यायला हवेत. मी यापूर्वी कर्नाटक आणि तेलंगणात याबद्दल चर्चा केली होते. मी आज पुन्हा गुजरातमध्ये आपल्याला ही गोष्ट हक्काने सांगू इच्छितो. देशातील प्रत्येक नागरिकाला माझे आवाहन आहे की, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करावा, ई-बसचा वापर करावा, कार पूलिंगला प्रोत्साहन द्या. ज्यांच्याकडे वाहन आहे त्यांनी आपल्यासोबत इतरांना लिफ्ट द्या, ज्यांच्याकडे ई-वाहन आहे त्यांनीही इतरांना सहकार्य करा.”

 
 
डिजिटल तंत्रज्ञान आता प्रगत होत आहे. त्यामुळे सरकारी आणि खासगी कार्यालयात दोन्ही ठिकाणी ऑनलाईन मिटींग घ्यावी. शाळांमध्ये ऑनलाईन क्लास सुरू करण्याचा विचार करायला हवा. याशिवाय खाद्यतेलाच्या वापरावरही नियंत्रण आणणे गरजेचे आहे. ज्यामुळे देश आणि आपल्या आरोग्याला चांगला लाभ मिळेल. सुरतच्या नागरिकांना मी तर खास आवाहन करत आहे.
सोन्याच्या आयातीवर देशाचे मोठे धन हे विदेशात जाते. मी देशवासीयांना आवाहन करतो आहे की, जोपर्यंत आयात सामान्य होत नाही तोपर्यंत सोन्याची खरेदी टाळा. जोपर्यंत युद्धजन्य स्थिती पुन्हा सामान्य होत नाही तोपर्यंत सोने खरेदी करू नका. सोन्याची गरज नाही. व्होकल फॉर लोकलला एक जनआंदोलन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.