लाल किल्ल्यावर जनजातीय संस्कृतीचा विराट संगम!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहंची राहणार मुख्य उपस्थिती

    12-May-2026   
Total Views |
Tribal Cultural Confluence Red Fort
 
मुंबई : (Tribal Cultural Confluence Red Fort) जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त जनजाती सुरक्षा मंचातर्फे जनजातीय सांस्कृतिक समागमाचे आयोजन करण्यात येत आहे. प्रेस क्लब ऑफ इंडिया येथे नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत दि. २४ मे रोजी लाल किल्ला मैदानावर होणाऱ्या सांस्कृतिक समागमाची माहिती देण्यात आली. जनजाती सुरक्षा मंचाचे राष्ट्रीय सहसंयोजक डॉ. राजकिशोर हांसदा, राष्ट्रीय टोली सदस्य व माजी न्यायाधीश प्रकाश उईके तसेच दिल्ली संयोजक अशोक कुमार गोंड यांनी या समागमाविषयी सविस्तर माहिती दिली.(Tribal Cultural Confluence Red Fort)
 
त्यांनी सांगितले की, भगवान बिरसा मुंडा हे भारतातील स्वातंत्र्य, सांस्कृतिक अस्मिता आणि सामुदायिक चेतनेचे प्रतीक आहेत. हा समागम एक ऐतिहासिक राष्ट्रीय उपक्रम म्हणून आयोजित करण्यात येत आहे. देशभरातील ५०० हून अधिक जनजातीय समाजांतील सुमारे दीड लाख प्रतिनिधी या समागमात सहभागी होण्याची शक्यता आहे. हा अत्यंत व्यापक सांस्कृतिक सोहळा ठरणार असून, धर्म, संस्कृती आणि परंपरांच्या जतनासाठी जनजातीय समाज इतक्या मोठ्या संख्येने प्रथमच राजधानी दिल्लीमध्ये एकत्र येत आहे.(Tribal Cultural Confluence Red Fort)
 
या समागमाचे प्रमुख आकर्षण भव्य सांस्कृतिक शोभायात्रा असणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या विविध भागांतून पारंपरिक वेशभूषेत आलेले जनजातीय बांधव आपल्या संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडवतील. ही शोभायात्रा पाच वेगवेगळ्या ठिकाणांहून प्रारंभ होणार असून, त्या जनजातीय परंपरा आणि सांस्कृतिक वैविध्याचे प्रतीकात्मक प्रतिनिधित्व करतील. सर्व यात्रांचे अंतिम एकत्रीकरण लाल किल्ल्यावर होईल, जिथे भव्य जनसभेचे आयोजन करण्यात आले आहे.(Tribal Cultural Confluence Red Fort)
 
त्यांनी पुढे सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लाल किल्ल्यावर होणाऱ्या जनसभेला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या समागमाच्या निमित्ताने दुर्गम वन-पर्वतीय भागांत राहणाऱ्या वनवासी बांधवांना जाणून घेण्याची आणि त्यांचे स्वागत करण्याची संधी प्रथमच दिल्लीकरांना मिळत आहे. विविध राज्यांतून मोठ्या संख्येने येणाऱ्या जनजातीय बांधवांसाठी निवास, भोजन, पाणी, वाहतूक, वैद्यकीय सुविधा, सुरक्षा आणि स्वच्छतेची व्यवस्था दिल्लीतील कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी केली आहे. हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून राष्ट्रीय स्तरावर एकत्र येण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. दिल्लीमध्ये होणारा हा सांस्कृतिक समागम “तू-मी, एक रक्त” या राष्ट्रीय भावनेला अधिक बळकट करणारा ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.(Tribal Cultural Confluence Red Fort)
 
समागमचे प्रमुख उद्देश पुढीलप्रमाणे -
  • भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्य आणि वारशाचे स्मरण
  • जनजातीय समाजाच्या समृद्ध आणि गौरवशाली सांस्कृतिक परंपरांचा गौरव
  • सांस्कृतिक आदानप्रदान आणि संवादासाठी राष्ट्रीय व्यासपीठ निर्माण करणे
  • सामाजिक समरसतेची भावना अधिक दृढ करणे




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक