‘जीवन प्रबोधिनी ट्रस्ट’तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप
20-Jun-2023
Total Views |
अंबरनाथ : मुंबईतील सामाजिक उपक्रम राबविणारी संस्था ‘जीवन प्रबोधिनी ट्रस्ट’यांच्यावतीने ’घडवू जीवन, करू प्रबोधन’ ही संकल्पना घेऊन दरवर्षीप्रमाणे यंदाही अंबरनाथ तालुक्यातील धारोळ जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक सत्यवान नर, अध्यक्ष अमित पवार, सरचिटणीस हेमंत मकवाना, खजिनदार गणेश क्षीरसागर, संयोजक गणेश पार्टे, मीडिया संयोजक रवींद्र जाधव व शाळेचे मुख्याध्यापक बळवंत शेवाळे, उपशिक्षक शैलेश बिरादार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अविनाश घुटे, काराव ग्रामपंचायत उपसरपंच नंदू शेंडे, अंगणवाडी सेविका हर्षदा ठाकरे यांसह ‘आधारिका फाऊंडेशन’चे विनायक मोरे व सदस्य उपस्थित होते.