Women's Reservation Bill Debate: महिला आरक्षणावरून महाराष्ट्रात राजकीय रणधुमाळी! खुल्या डिबेटचं आव्हान, सुळे-राऊतांचा पलटवार, म्हणाले....

Total Views |
 
Women
 
मुंबई : (Women's Reservation Bill Debate) महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून महाराष्ट्रातही याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. “आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणत्याही विरोधकाने माझ्यासोबत खुली चर्चा करावी, मी त्यासाठी पूर्णपणे तयार आहे,” असं स्पष्ट आव्हान त्यांनी दिलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अधिक तापलं आहे. (Women's Reservation Bill Debate)
 
फडणवीसांच्या या आव्हानाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तत्काळ प्रतिसाद दिला. “वेळ आणि ठिकाण ठरवा, मी चर्चेसाठी नक्की उपस्थित राहीन,” असं सांगत त्यांनी थेट सामना स्वीकारला. विधेयक मांडलं जात असताना आपण दिल्लीत उपस्थित होतो आणि त्या दिवशी नेमकं काय घडलं याची संपूर्ण माहिती आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला. त्यामुळे संभाव्य डिबेटकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. (Women's Reservation Bill Debate)
 
हेही वाचा: परिसीमन आणि महिला आरक्षणाचा पेच
 
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही या मुद्द्यावरून फडणवीसांवर निशाणा साधला. “फडणवीस वकील आहेत, त्यांनी आधी विधेयक नीट वाचावं,” असा टोला लगावत त्यांनी मुख्यमंत्री खोटं बोलत असल्याचा आरोप केला. “संसदेत बसलेल्या सदस्यांपेक्षा यांची अक्कल जास्त आहे का?” असा सवाल करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. (Women's Reservation Bill Debate)
 
राऊत यांनी आणखी गंभीर दावा करत म्हटलं की, महिला आरक्षण विधेयक प्रत्यक्षात पाडण्यात आलेलं नाही, तर सत्ताधारी पक्षामध्येच अंतर्गत राजकीय समीकरणं सुरू आहेत. “भाजपमध्ये भविष्यातील सत्तेबाबत गटबाजी सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे,” असा दावा त्यांनी केला. तसेच, “मोदींनी इच्छाशक्ती दाखवली असती तर हे विधेयक सहज मंजूर झालं असतं,” असं म्हणत त्यांनी या प्रकरणात गृहमंत्री अमित शाह यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. (Women's Reservation Bill Debate)
 
या सर्व घडामोडींमुळे महिला आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असून आगामी काळात हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. (Women's Reservation Bill Debate)
 
 

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com