ठाणे : (Devend Fadnavis) ठाण्याच्या प्रगतीचा नवा इतिहास घडवण्यासाठी आणि ठाणेकरांच्या स्वप्नांना नवे बळ देण्यासाठी महाराष्ट्राच्या विकासाचे शिल्पकार, मुख्यमंत्री देवेंद् फडणवीस यांचे चर्चासत्राचे आयोजन ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे भाजपच्या वतीने बुधवारी करण्यात आले होते. ठाणेकरांच्या मनातील प्रश्नांना थेट उत्तरं, शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी ठोस रोडमॅप, विकासाच्या दिशेने निर्णायक असे विषय संवादामध्ये घेण्यात आले होते. या चर्चासत्रांध्ये ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला. यावेळी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संदीप केले आदी उपस्थित होते. (Devend Fadnavis)
या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ठाण्यात वाहतूक महत्वाचा प्रश्न आहे, ठाण्यामध्ये दळणवळणाच्या दृष्टीने जुन्या सरकारच्या काळात 11 किलोमीटरची मेट्रो केली, माझ्याकडे जेव्हा कारभार आला तेव्हा 475 किलोमीटर मेट्रोचे काम सुरू केले. आज जवळपास 200 मीटरचे काम पूर्ण झाले आहे, 2029 पर्यंत आम्ही सर्व मेट्रो कनेक्टिव्हिटी पूर्ण करू, ठाण्याच्या रिंग मेट्रोचे देखील पण प्रस्ताव तयार केला आहे. रेल्वेतून दरवाज्यात उभे राहून लोक प्रवास करत आहेत. पंतप्रधान मोदींच्या काळात आपण प्लॅटफॉर्म वाढवले स्टेशनची कामे केली. आता पुढच्या काळात आपण मेट्रो सारख्या लोकल वातानुकूलित येणार आहोत तसेच तिकीट दर देखील लोकल चेच राहणार आहेत. इबसेस पण सुरू करत आहोत. एक तिकिटावर भविष्यात आपण प्रवास करू शकणार आहोत हे सर्व एक ऍप वर असणार आहे. ठाणे आणि एमएमआर रिजन मधील सर्व ठिकाणी पण पब्लिक ट्रान्सपोर्टचे आपण नियोजन केले आहे. (Devend Fadnavis)
हेही वाचा : Palika Election 2026: "निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुशासनाचा संकल्प; मुख्य निवडणूक निरीक्षकांकडून तयारीचा सविस्तर आढावा"
बुलेट ट्रेनचा उद्धवजींना राग आला यामुळे कामे संथ झाले. आता वेगाने काम सुरू आहे, 2028 पर्यंत आपल्याला बुलेट ट्रेन पाहायला मिळेल. (Devend Fadnavis)
मुंबई कोस्टल रोड बांद्रा पर्यंत आला आहे, तो वर्सोवा, दहिसर भाईंदर नंतर विरारला जाणार आहे, विरार वरून थेट अलिबाग पर्यंत जाणार आहे. ठाण्याच्या खाडी आणि वसईची खाडी यावर कोस्टल रोड तयार करणार आहोत, तो पुढे खारेगाव ते गायमुख पर्यंत नेणार आहोत, ठाण्यात वाहतूक कोंडी होते ती गुजरात वरून वाहतूक येते ती जी एन पीटीला जाते, बाळकुम ते साकेत रस्ता आपण करतोय तो आपण साकेतमध्ये जोडणार आहोत आणि तेथून आमने फाटा पर्यंत हा रस्ता नेण्याचे आहे.कशेळी ते आमने फाटा थेट भाईंदर येथे कोस्टल रोडला जोडणार आहोत असे रिंग तयार होणार आहे. यामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच ठाणे ते बोरिवली आपण भुयारी बोगदा तयार करत आहोत. (Devend Fadnavis)
मुंबईत पॉड टॅक्सीच्या विचार करतोय तसा आम्ही इतर ठिकाणी देखील विचार करतोय, खाडीवरून पूल बांधण्याचा विचार आहे, 200 नोटिकल बांधण्याचा विचार आहे, कोलशेत या ठिकाणी 5 जेटी पण तयार करतोय, यामध्ये वसई पासून ते कल्याण पासून कोलशेत पर्यंत वॉटर टॅक्सी तयार करणार आहोत असे 21 केंद्र आम्ही तयार केले आहेत, याकरिता बाहेरील देशासोबत अभ्यास करून करार केला आहे. यामुळे 1 कोटी 60 लाख लोक खाडी मार्गातून वॉटर टॅक्सी तून प्रवास करतील. (Devend Fadnavis)
डंपिंग हा विषय आउट डेटेड झाले आहे, आता कचऱ्यावर प्रोसेसिंग करून खत तयार करतो, कचऱ्यापासून गॅस आणि विद्युत निर्मितीचा प्रकल्प अंतिम टप्यात आहे. आता डंपिंग करता येणार नाही कारण कचरा डंप करून ठेवून त्या जागेवर बायोमॅट्रिक करत आहोत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत खूप मोठा निधी पंतप्रधान मोदी यांनी उपलब्ध केला आहे. डंपिंगचा प्रश्न आता कमी होत चालला आहे. पुढील 3 ते 4 वर्षात डंपिंग प्रश्न संपणार आहे. (Devend Fadnavis)
लोकसंख्या वाढत आहे, यामुळे पाण्याचा प्रश्न तयार होत आहे. काळू धरण प्रकल्पामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जमीन ताब्यात घ्यावी लागणार आहे, अशा अनेक अडचणीतून आम्ही जात आहोत. पोशीर आणि शिलार हे दोन प्रकल्प बद्दल मी माहिती घेतली हे प्रकल्प अडलेले का आहेत, यावर सर्व माहिती घेऊन त्याचे टेंडर देऊन आता आम्ही काम सुरू करतोय. पुढील दोन वर्षात पाण्याचा प्रश्न सुटेल , काळू धरणाचा प्रश्न देखील लवकर सुटेल. (Devend Fadnavis)
हेही वाचा : अशी ही बनवाबनवी...
एमएमआररिजनमध्ये विचार करताना परदेशी मधील कुठली युनिव्हर्स्टी आली तर त्यांना जागा देऊ आणि पहिल्याच टप्प्यात जगातील 5 युनिव्हर्सिटी यांना परवानगी मिळाले आहे, यामुळे पुढील वर्षानंतर 1 लाख विद्यार्थी फॉरेन युनिव्हर्स्टी मध्ये शिकतील. यामुळे परदेशात आपली मुले जी जाऊन शिकत होती त्याचा आता खर्च कमी होईल. नवी मुंबई एअरपोर्टला जाण्याकरिता ठाण्यातून थेट नवी मुंबई एअरपोर्टला जात येईल असा रोड तयार होणार आहे. जियो युनिव्हर्सिटी देखील येत आहे. एअरपोर्ट जवळ नवीन बीकेसी तयार करत आहोत, डोंबिवली जवळ बुलेट ट्रेन स्टेशन जवळ मोठे हब तयार करत आहोत. (Devend Fadnavis)
नगरसेवक मालक असल्यासारखे वागायला लगले आहेत, ही मानसिकता घातक आहे. आपल्याला सर्व कारभारामध्ये ट्रान्सफॉरंसी आणणे आवश्यक आहे. अनधिकृत बांधकाम आता कुठल्या बांधकामाकरिता काय सुरू आहे ते आपल्याला डिजिटल माध्यमातून कळणार आहे. (Devend Fadnavis)
अनाथ आरक्षण विषय आहे, अनाथ आश्रमात जी मुले आहेत त्यांना जातच माहिती नाही, यामुळे ती खूप मागे राहतात यामुळे त्यांना आपण एक टक्के आरक्षण मिळाले पाहिजे असे आम्ही काम केले. यामुळे 800 मुली आणि मुले या 1 टक्का आरक्षणामुळे आज महाराष्ट्र शासनात कामाला लागली आहेत.यामुळे संवेदना मी जपली आहे आणि पुढेही जपणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले .
ते पुढे म्हणाले कि ठाण्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांची इच्छा होती की आपण स्वतंत्र निवडणूक लढावी कारण ही निवडणूक दहा वर्षांनी आली. बाळासाहेबांची शिवसेना आता शिंदे सेना चालवत आहेत, यामुळे कुणाच्या मनात राग नको यामुळे आम्ही कमी जागा ठाण्यात घेतल्या आहेत. मी माझ्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो. आपण अट्टाहास न करता आपण कमी जागा लढवू, एकनाथ शिंदे यांची ठाणे ओळख आहे, यामुळे आम्ही निर्णय घेतला. (Devend Fadnavis)
महाराष्ट्रात एकच ब्रँड होता हिदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. यामुळे आमची युती इतकी मजबूत आहे की आता कोणताही ब्रँड आला तरी आम्ही युती तुन उत्तर देऊ. आता पर्यावरण हा महत्वाचा मुद्दा झाला आहे आता पर्यावरण पूरक गुंतवणूक करणे आवश्यक आहे आणि आम्ही ते प्लॅन तयार करत आहोत, वाहतूक जर आपण इलेक्ट्रिक वर आणली तर प्रदूषण कमी होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चासत्रामध्ये सांगितले. (Devend Fadnavis)