Palika Election 2026: "निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुशासनाचा संकल्प; मुख्य निवडणूक निरीक्षकांकडून तयारीचा सविस्तर आढावा"

    08-Jan-2026
Total Views |
 
Palika Election 2026
 
ठाणे : (Palika Election 2026) उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, मुंबई यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेश, परिपत्रके व निर्देशांनुसार तसेच आदर्श आचारसंहितेच्या तरतुदींनुसार निवडणूक प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत, पारदर्शक, निष्पक्ष व निर्भय वातावरणात पार पाडण्याच्या उद्देशाने बुधवारी मुख्य निवडणूक निरीक्षक निलेश गटणे व निवडणूक निरीक्षक रविंद्र ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. (Palika Election 2026)
 
सदर बैठकीमध्ये निवडणूक प्रक्रियेतील सर्व महत्त्वाच्या बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये मतदान प्रक्रिया, मतदान केंद्रांचे व्यवस्थापन, स्ट्राँग रूमची सुरक्षा व्यवस्था, मतदान साहित्याचे वितरण व स्वीकृती, मतदान पथकांची नियुक्ती, मॉक पोलची अंमलबजावणी, मतदान केंद्रांची सज्जता, मतदान प्रतिनिधी (एजंट) यांचे अधिकार व मर्यादा तसेच प्रभाग रचना आदी बाबी निश्चित केलेल्या नियमावलीनुसार काटेकोरपणे राबविण्याचे आणि त्यासाठी सूक्ष्म व परिणामकारक नियोजन करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. (Palika Election 2026)
 
हेही वाचा : व्हेनेझुएलामध्ये ‘नवा भिडू, नवे राज्य’! 
 
यावेळी विशेषत्वाने असे आदेश देण्यात आले की, कोणत्याही उमेदवार, राजकीय पक्ष अथवा लोकप्रतिनिधींनी नियुक्त केलेल्या खाजगी सुरक्षा रक्षकांना मतदान केंद्र परिसर, मतदान कक्ष अथवा मतमोजणी कक्षात प्रवेश देण्यास सक्त मनाई राहील, असे स्पष्ट करण्यात आले. (Palika Election 2026)
 
मतदारांना मतदानासंबंधी अधिकृत, प्रमाणित व सुलभ माहिती एका ठिकाणी उपलब्ध व्हावी, यासाठी महानगरपालिकेमार्फत अधिकृत ऑनलाईन माहिती प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर प्रणालीचा औपचारिक शुभारंभ दिनांक 06 जानेवारी 2026 रोजी निवडणूक अधिकारी, आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आला. (Palika Election 2026)
 
या अधिकृत ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राचा अचूक पत्ता, तेथे पोहोचण्यासाठी मार्गदर्शन करणारा नकाशा , मतदार यादीतील भाग क्रमांक व अनुक्रमांक, वैयक्तिक तपशील, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे तसेच प्रभाग रचना इत्यादी सर्व आवश्यक माहिती सहज उपलब्ध होणार आहे. या सुविधेमुळे मतदारांना आता प्रत्यक्ष ‘व्होटर स्लिप’वर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही, असे यावेळी नमूद करण्यात आले. (Palika Election 2026)
 
हेही वाचा : अशी ही बनवाबनवी...  
 
तसेच, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार व आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने, निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिनांक 14, 15 व 16 जानेवारी 2026 रोजी मद्यविक्रीची सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. (Palika Election 2026)
 
यावेळी मुख्य निवडणूक निरीक्षक निलेश गटने, निवडणूक अधिकारी, आयुक्त मनिषा आव्हाळे , निवडणूक निरीक्षक रविंद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब तिडके, गणेश सांगळे इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (Palika Election 2026)