Pimpri Chinchwad : भाजपाचे चार उमेदवार बिनविरोध; पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये भाजपाने खाते उघडले

02 Jan 2026 16:46:37



 

पुणे: (Pimpri Chinchwad) भाजपने पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये खातं खोललं आहे. त्यामुळे दोनही शहरात जल्लोष सुरु आहे. डोंबिवली पाठोपाठ पुणे आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
 

प्रभाग क्रमांक ३५ सनसिटी माणिक बाग येथून भाजपच्या उमेदवार मंजुषा नागपुरे आणि ३५ ड मधून श्रीकांत जगताप हे दोन उमेवदार बिनविरोध निवडून आले आहेत. यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केला. भाजपा शहर कार्यालयात या उमेदवाराचा सत्कार करण्यात आला. (Pimpri Chinchwad)
 

हेही वाचा :  Gaurav Gogoi : काँग्रेस नेते गौरव गोगोई हे पाकिस्तानी एजंट


 
पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध शिंदेंची शिवसेना विरुद्ध काँग्रेस-ठाकरेंची शिवसेना अशी चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. पुण्याची सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपने प्रचाराचा जोर लावला आहे. अजित पवारांनीही पुणे महापालिकेवर पुन्हा एकदा वर्चस्व मिळवण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी विरोधी उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे प्रभाग क्रमांक ३५ मधून मंजुषा नागपुरे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. या प्रभागात एकूण सहा अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी दोन अर्ज छाननीमध्ये बाद झाले, तर इतर तीन जणांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे मंजुषा नागपुरे या बिनविरोध निवडून आल्या. यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. प्रभाग ३५ ड या सर्वसाधारण जागेसाठी नितीन गायकवाड यांनी अर्ज मागे घेतल्याने त्या ठिकाणी भाजपचे श्रीकांत जगताप हे बिनविरोध निवडून आले. त्यामुळे निवडणुकी आधीच भाजप दोन जागी विजयी झाला आहे. (Pimpri Chinchwad)
 

हे वाचलात का ?: Navnath Ban : संघाचे कार्यालय महाराष्ट्रात आहे - नवनाथ बन 


 
पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) मध्ये देखील भाजपाचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. रवी लांडगे यांची सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आणि पाठोपाठ मोरवाडी प्रभाग क्रमांक १० मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतल्याने भाजपच्या माजी नगरसेविका सुप्रिया चांगदुडे यांची निवड झाली आहे. वर्षा दत्तात्रेय भालेराव यांना राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी होती. त्यांच्यासह आणखी तीन उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने चांदगुडे यांची निवड झाली आहे. भाजपने सलग दुसरी जागा बिनविरोध करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दणका दिला आहे. (Pimpri Chinchwad)
 

 
Powered By Sangraha 9.0