Gaurav Gogoi : काँग्रेस नेते गौरव गोगोई हे पाकिस्तानी एजंट

Total Views |
 
Gaurav Gogoi
 
मुंबई: (Gaurav Gogoi) आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी आसाम प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्ष उपनेते गौरव गोगोई (Gaurav Gogoi) यांच्यावर पाकिस्तानशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. याबाबत शर्मा यांनी लवकरच ठोस पुरावे जनतेसमोर सादर करणार असल्याचे सांगितले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, गौरव गोगोई हे पूर्णपणे पाकिस्तानी एजंट आहेत. त्यांना आपल्या देशात एका परदेशी शक्तीने बसवले आहे. तसेच त्यांनी केलेले आरोप जर खोटे असतील तर गोगोई (Gaurav Gogoi) यांनी त्यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करावा, असे आव्हानही शर्मा यांनी दिले.
 
हेही वाचा : Shah Rukh Khan : बांगलादेशी खेळाडूला सामील केल्याने शाहरूख खानवर टिकेची झोड 
 
मुख्यमंत्र्यांनी याबाबत असेही संकेत दिले की, संपूर्ण प्रकरण अधिक निष्पक्ष आणि व्यापक चौकशीसाठी केंद्रीय एजन्सीकडे सोपवले जाऊ शकते. दरम्यान गौरव गोगोई (Gaurav Gogoi) यांनी मुख्यमंत्र्यांचे सर्व आरोप फेटाळून लावत त्यांचे कथानक एका स्वस्त चित्रपटासारखे असल्याचे म्हटले. गोगोई म्हणाले की, आसामच्या लोकांना अशा आरोपांमागील सत्य समजले आहे आणि त्याचा कोणताही राजकीय परिणाम होणार नाही.
 
काय आहे पाकिस्तान कनेक्शनचा दावा
 
मागील वर्षी गोगोई (Gaurav Gogoi) आणि त्यांच्या पत्नी एलिझाबेथ कोलबर्न यांच्यावर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी कथित संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांनंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आली. या पथकाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला. मुख्यमंत्री शर्मा यांच्या मते, तपासात देशाच्या सार्वभौमत्वावर गंभीर प्रश्न उपस्थित करणारे तथ्य समोर आले आहे. (Gaurav Gogoi)
 
 

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.