Shah Rukh Khan : बांगलादेशी खेळाडूला सामील केल्याने शाहरूख खानवर टिकेची झोड

Total Views |
 Shah Rukh Khan
 
मुंबई : (Shah Rukh Khan) कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) या संघाने यावर्षीच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या लिलावात बांगलादेशी क्रिकेटपटू मुस्तफिजूर रहमानला ९.२० कोटी रूपयांना विकत घेतले. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा केकेआर संघाचा मालक आहे. त्यामुळे भारतात शाहरुखविरुद्ध निदर्शने होत आहेत. (Shah Rukh Khan)
 
याबाबत कथाकार देवकीनंदन ठाकूर यांनी म्हटले की, शेजारच्या देशातील अल्पसंख्याक हिंदूंना हिंसक वागणूक दिली जात आहे. अशा परिस्थितीत बांगलादेशी खेळाडूला आयपीयल संघात समाविष्ट केल्याने चुकीचा संदेश जात आहे. शाहरूख खानला (Shah Rukh Khan) उद्देशून ते पुढे म्हणाले की, या भारतीयांनी तुम्हाला हिरो बनवले हे विसरू नका. जे तुम्हाला हिरो बनवू शकतात ते झिरोदेखील बनवू शकतात.
 
हेही वाचा :  Iran Crisis : इराणमध्ये महागाईविरोधात जनआक्रोश; आंदोलनांना हिंसक वळण, सात जणांचा मृत्यू
 
या प्रकरणावर रामभद्राचार्य म्हणालेत की, शाहरुख खानला (Shah Rukh Khan) भारतात बांगलादेशी क्रिकेटपटू का खेळवायचे आहेत. बांगलादेशातील घटना पाहता हे दुर्दैवी आहे. परंतु शाहरूख खान हे कृत्य करूच शकतो कारण तो काही हिरो नाही. त्याला कोणतेही चारित्र्य नाही. त्याची भूमिका नेहमीच देशविरोधी राहिली आहे.
 
संत देवेशाचार्य यांनी देखील यावर प्रश्न विचारला की, शाहरुख खानने (Shah Rukh Khan) कधी बांगलादेशातल्या हिंदूंसाठी ट्विट केले का? त्याचा नेहमीच हिंदूविरोधी अजेंडा राहिला आहे. तसेच बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, भारतीय खेळाडूंनी, बीसीसीआयने आणि आयपीयल संघाच्या मालकांनी हिंदूंच्या रक्षणासाठी बोलले पाहिजे.
 
हे वाचलात का ?: Karnataka EVM Survey : कर्नाटकमधील ८३ टक्के लोकांचा ईव्हीएमवर विश्वास, काँग्रेस सरकारच्या सर्वेक्षणाने राहुल गांधींच्या दाव्याला खोडून काढलं!  
 
रहमान विमानतळाबाहेर पडू शकणार नाही
 
भाजपचे माजी आमदार संगीत सोम म्हणाले, "बांगलादेशात ज्या पद्धतीने हिंदूंवर अत्याचार होत आहेत. हिंदूंची कत्तल होत आहे. हिंदू बहिणी आणि मुलींवर बलात्कार होत आहेत. घरे जाळली जात आहेत. तरीदेखील शाहरुख खानसारखे देशद्रोही अशा देशांमधील खेळाडूंमध्ये गुंतवणूक करतात. परंतु शाहरूखने हे लक्षात ठेवावे की, रहमान भारतात आल्यानंतर विमानतळाबाहेर पडू शकणार नाही, याची खबरदारी आम्ही घेऊ. (Shah Rukh Khan)
 
  

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.