मुंबई : (Karnataka EVM Survey) कर्नाटकमधील काँग्रेसच्या सरकारने लोकसभा निवडणूक २०२४ संबंधी केलेल्या सर्वेक्षणात राज्यातील ८३ टक्के जनतेने इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर (ईव्हीएम) विश्वास व्यक्त केला आहे. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाच्या विश्वासाहर्तेवर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. निवडणुकीत मतचोरी होत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी अलीकडे केला होता. मात्र कर्नाटकातील त्यांच्याच सरकारने केलेल्या सर्वेक्षणात हे दावे खोडून निघाले आहेत, अशी प्रतिक्रिया आता भाजपने दिली आहे.(Karnataka EVM Survey)
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी व्ही. अंबुकुमार यांनी हा सर्व्हे केला होता. बंगळुरू, बेळगाव, कलबुर्गी आणि म्हैसूर प्रशासकीय विभागातील १०२ विधानसभा मतदारसंघ आणि ५१०० लोकांना या सर्वेक्षणात सामील करून घेतले होते. इव्हॅल्यूएशन ऑफ एंडलाईन सर्व्हे ऑफ कॅप (नॉलेज, अटीट्यूड अँड प्रॅक्टिस) ऑफ सिटिझन, या नावाने या सर्वेक्षणाचा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. यात ८३ टक्के लोकांनी ईव्हीएमवर विश्वास व्यक्त केला. ६९.३९ टक्के लोकांनी ईव्हीएमचा निकाल अचूक असल्याचे म्हटले. तर १४.२२ टक्के लोकांनी ईव्हीएमला संपूर्ण पाठिंबा दिला.(Karnataka EVM Survey)
२०२३ साली झालेल्या सर्वेक्षणात ७७.९ टक्के लोकांनी ईव्हीएमवर विश्वास दर्शवला होता. यंदाच्या सर्व्हेत यात आणखी भर पडली आहे. कलबुर्गी विभागातून सर्वाधिक लोकांनी ईव्हीएमवर विश्वास दाखवला. येथील ८३.२४ टक्के लोकांनी ईव्हीएमवर सहमती दर्शवली. ११.२४ टक्के (एकूण ९४.४८) लोकांनी डोळे झाकून ईव्हीएम सुरक्षित असल्याचे म्हटले. म्हैसूर विभागात ८८.६८ टक्के, बेळगामध्ये ८५.३३ टक्के आणि बंगळुरूमध्ये सर्वात कमी ७३ टक्के लोकांनी सहमती दर्शवली.(Karnataka EVM Survey)
या सर्वेक्षणाची माहिती समोर आल्यानंतर कर्नाटक भाजपचे नेते आर. अशोक यांनी एक्सवर पोस्ट करत काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, "अनेक वर्षांपासून राहुल गांधी देशभरात यात्रा करून देशातील लोकशाही धोक्यात असल्याचे सांगत आहेत. ईव्हीएमवर विश्वास नसल्याचे सांगून आपल्या यंत्रणांवर ते अविश्वास व्यक्त करतात. पण कर्नाटकने वेगळीच गोष्ट सांगितली आहे.(Karnataka EVM Survey)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\