Navnath Ban : संघाचे कार्यालय महाराष्ट्रात आहे - नवनाथ बन

    02-Jan-2026
Total Views |
 
Navnath Ban
 
मुंबई : (Navnath Ban) "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय हे महाराष्ट्र आणि नागपूरमधे आहे आणि संघाच सगळ कामकाज हे मराठीमधूनच चालत. संघ कधी भाषावादाला थारा देत नाही. (Navnath Ban)
 
संजय राऊत यांना दोन भाषेच्या पलीकडे कोणती भाषा येत नाहीत.जनाब संजय राऊत हे राहुल गांधी यांच्या हातचे बाहुले आहेत" असे प्रतिपादन भाजपा माध्यम प्रमुख नवनाथ बन (Navnath Ban) यांनी शुक्रवार दि.२ रोजी केले.
 
"राहुल नार्वेकर यांनी त्यांच्यावर होणाऱ्या आरोपावर स्पष्टीकरण गुरुवार दि.१ रोजी दिल आहे.संजय राऊत यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी अनेक उमेदवारांना धमकावलं आहे. राऊत हे खोट बोलण्यात एक्सपर्ट आहेत त्यामुळे खोट नरेटिव्ह पसरवण्याचं काम करत आहेत.जनता मात्र आत्ता खूप हुशार आहे." असेही बन म्हणाले. (Navnath Ban)
 
हेही वाचा :  BMC Elections: भाजप-शिवसेनेच्या प्रचाराचा लवकरच शुभारंभ; वरळीतून फुंकणार रणशिंग
 
"उमेदवार जोपर्यंत स्वाक्षरी करत नाही तोपर्यंत फॉर्म मागे घेतला जात नाही यात आरओचा काय संबध आहे? तुम्ही सुद्धा मागच्या दाराने निवडणूक लढला आहात मग तुम्हाला माहीत नाही का? वाघमारे यांच्या आडनावाचा गैरवापर करत त्यांच्यावर टीका करण हे योग्य आहे का? निवडणूक आयोगाला धमकावण्याचं काम संजय राऊत करत आहेत. तुम्ही जनतेत जाऊन काम करा.महायुती ही जनतेत जाऊन काम करत आहे." असेही बन (Navnath Ban) यांनी स्पष्ट केले.
 
"राज ठाकरेंच्या बाबतीत उद्धव ठाकरे यांचं धोरण हे वापरा आणि फेकून द्या असा असणार आहे.यापूर्वीचा इतिहास तुम्ही बघा म्हणजे कळेल.आदित्य ठाकरे बोलले होते की संपलेल्या पक्षावर मी बोलणार नाही आणि त्याच संपलेल्या पक्षासोबत आत्ता यांना जाव लागत आहे.मनसेचे ७ नगरसेवक कोणी फोडले होते? पक्ष फोडण्याच पहिल काम हे उद्धव ठाकरे यांनी केल आहे. पक्ष फोडून उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.बिनविरोध जर नगरसेवक निवडून येत असतील तर त्या लोकांवर जनतेचा विश्वास आहे आणि भाजपवर लोकांचा विश्वास आहे." असेही बन (Navnath Ban) म्हणाले.
 
हे वाचलात का ?: Municipal elections: भाजपाचे आणखी दोन उमेदवार बिनविरोध विजयी
 
"धमकी देण्याच काम हे संजय राऊत करतात आणि त्यांनी एका महिलेला फोनवरून कशी धमकी दिली हे सगळ्यांनी पाहील आहे.राज्यातील अनेक भागात उबाठाच्या कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला आहे.निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट न दिल्यामुळे त्यांनी पक्षातून राजीनामे देऊन अपक्ष उमेदवारी भरली आहे. वापरा आणि फेकून द्या ही उद्धव ठाकरे यांची पॉलिसीच आहे." अशी टीका त्यांनी केली. (Navnath Ban)
 
"भाजपचा कार्यकर्ता हा निष्ठावंत आहे आणि विचारांवर चालणारा आहे.जे बंडखोर भाजपमधे आहेत ते शुक्रवार संध्याकाळ पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतील.आणि सगळ्यांची नाराजी पक्षातील नेते दूर करतील" असेही त्यांनी स्पष्ट केले. (Navnath Ban)