पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना माजी राजदूतांचे खडेबोल ; पंतप्रधान मोदींविरोधात केलेल्या ट्विटवरून सुनावले
28-Jun-2025
Total Views |
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा सिंधू जल करार रद्द केल्यापासून पाकिस्तान भारतासोबत विविध मार्गाने चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहे. आता यातच पाकचे संरक्षणमंत्री असलेल्या ख्वाजा आसिफ यांचे ट्विट आगीत तेल ओतणारे ठरले आहे. आसिफ यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात एक ट्विट करत, त्यांचा 'कसाई' म्हणून उल्लेख केला आहे. मात्र पाकिस्तानच्या माजी राजदूतांनी संरक्षण मंत्र्यांनाच उलट खडेबोल सुनावल्याचे दिसतेय.
हक्कानी यांनी आसिफ यांच्या ट्विटला उत्तर देताना म्हटले की, "पंतप्रधान शाहबाज शरीफ भारताशी विविध मार्गाने चर्चेबद्दल प्रयत्न आहेत, तर तुम्ही मोदींना अपशब्द वापरत चर्चेबद्दंलच्या सर्व प्रयत्नांवर पाणी फिरवण्याचे काम करत आहात. असे असेल तर भारतासोबतचा संवाद ही अशक्यप्राय गोष्ट आहे." असे बोलत हक्कानी यांनी पाकच्या संरक्षणमंत्र्याना चांगलेच सुनावले आहे.