मुंबई : (Ameet Satam) "अनेक वर्षापासून तुम्ही मुंबईकरांची जी सेवा करता त्याला माझा मनापासून सलाम आहे. मुंबई तुमच्यासारख्या कष्टकऱ्यांची आहे. मुंबईने बॉम्बस्फोट पासून अतिरेकी हल्ल्यापर्यंत अनेक आघात बघितले आहेत. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील विकासाची घोडदौड सुद्धा मुंबई आता पहात आहे.येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत तुमच्या सहकार्याने महापालिकेवर भाजपा आणि महायुतीच्या भगवा फडकलेला पाहायचा आहे." असे प्रतिपादन भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी सोमवार दि.२२ रोजी केले. भाजपाच्या वतीने आयोजित रेल्वे बूट पॉलिश फेडरेशन मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात ते बोलत होते. (Ameet Satam)
हेही वाचा : BMC Elections : महापालिका निवडणुकांदरम्यान पैशांच्या गैरव्यवहारावर राहणार नजर; आयकर विभागाचा २४x७ नियंत्रण कक्ष कार्यरत
यावेळी मुंबई महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी, राजेश शिरवडकर, गणेश खणकर, श्वेता परुळकर यांसह कैलास वर्मा, अरुण दळवी, प्रतीक कर्पे, रामकिशन मेहरा, दया किशोर भारती, ब्रुजलाल राम, रामप्रवेश राम, हरिश्चंद्र खन्ना यासह रेल्वे बूट पॉलिश फेडरेशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Ameet Satam)
"पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला पुढे नेत असून भविष्यात भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल. मागील अकरा वर्षात देशातील गरिबांना मानसन्मान नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाला असून विकासाची अंत्योदय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचली.तसेच प्रत्येकाला लंच टाइम असतो तसा तुम्हालाही असलाच पाहिजे.जुन्या लोकांचे लायसेन्स रिनिव्यू केले पाहिजेत.येणाऱ्या काळात संत रोहिदास यांच्या प्रेरणेने रेल्वे मंत्रांसोबत तुमची चर्चा घडवून आणू."असेही अमीत साटम (Ameet Satam) म्हणाले.
हे वाचलात का ?: Devendra Fadnavis : कुठल्याही विजयाने मातणार नाही हाच आपला संकल्प : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यावेळी रेल्वे बूट पॉलिश फेडरेशन मार्फत महत्वाच्या चार मागण्यांचे निवेदन अमीत साटम यांना देण्यात आले. यावेळी आचार्य पवन त्रिपाठी,गणेश खणकर, राजेश शिरवडकर,यांसह फेडरेशनचे पदाधिकारी यांनीही मनोगत व्यक्त केले. (Ameet Satam)
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी बूट पॉलिश कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची असणारी साधने स्टेजवर ठेवण्यात आली होती.मुंबई भाजपा अध्यक्ष अमीत साटम यांचे बूट पॉलिश करण्यासाठी कर्मचारी स्टेजवर गेले असता, त्यास नकार देत अमीत साटम यांनी स्वतःच्या हाताने कर्मचाऱ्यांचे बूट पॉलिश केले.यामुळे सर्व सदस्य,कर्मचारी भारावून गेलेले दिसले. असा सन्मान यापूर्वी कोणत्याही लोकप्रतिनिधींनी दिला नाही अशी भावना यावेळी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकावून आपण परिवारात एकत्र स्नेहभोजन करू अशी ग्वाही साटम (Ameet Satam) यांनी दिली.