नागपूर : (Devendra Fadnavis) नागपूर जिल्ह्यात आपल्याला अभूतपूर्व विजय मिळाला असून कुठल्याही विजयाने आपण मातणार नाही, हा आपला संकल्प आहे. विजय हा आपल्या कामाची पावती समजून अधिक लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने येत्या काळात प्रयत्न करायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूर जिल्ह्यातील नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना केले.
यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. आशिष देशमुख, आ. समीर मेघे. आ. चरणसिंग ठाकूर यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र (Devendra Fadnavis) फडणवीस म्हणाले की, "आपण सगळ्यांनी या निवडणूकीत अभूतपूर्व असा विजय मिळवला आणि २७ पैकी २२ नगरपालिका भाजपच्या झेंड्याखाली जिंकलो. महायुतीच्या २४ नगरपालिका निवडून आल्या असून २ नगरपालिकांमध्ये आपला पराभव झाला. पण अतिशय उत्तम असा निकाल आपल्याला मिळाला आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रातील मतदारांचे आभार मानतो. महाराष्ट्रात भाजप हाच नंबर एकचा पक्ष आहे, हे कालच्या निकालांनी स्पष्ट केले." (Devendra Fadnavis)
"एकूण निवडणूकांमध्ये ७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे निवडून आले आहेत. महाविकास आघाडीचे फक्त ५० च्या जवळपास नगराध्यक्ष आलेत, तर आपले २१० नगराध्यक्ष निवडून आलेत. त्यामुळे या निवडणूकीत आपण महाविकास आघाडीचा पूर्णपणे सफाया केल्याचे स्पष्ट झाले. सर्वात जास्त स्ट्राईक रेट हा भाजपचाच आहे. आपण नगराध्यक्ष पदाकरिता जेवढ्या निवडणूका लढलो त्यापैकी ६५ टक्के आपले नगराध्यक्ष निवडून आले असून हासुद्धा एक रेकॉर्ड आहे. तसेच महाराष्ट्राच्या इतिहासात ३ हजारांहून अधिक नगरसेवक निवडून येण्याचा रेकॉर्ड भाजपने केला आहे. तसेच महाराष्ट्रात एकूण नगरसेवकांच्या ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपचे निवडून आले आहेत. गेल्या ३० वर्षात कुठल्याच एका पक्षाचे एवढे नगरसेवक निवडून आले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राच्या नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या सरकारवर विश्वास दाखवून आपल्या कामाची पावती दिली आहे,” असेही ते म्हणाले. (Devendra Fadnavis)
विरोधकांचे किल्ले उध्वस्त झाले
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात तयार केलेल्या विश्वास आणि विकासाच्या राजकारणाला प्रत्येक निवडणूकीत प्रतिसाद मिळतो आहे. भाजपला प्रचंड मोठा जनादेश मिळाला आहे. नागपूर जिल्ह्यात अभूतपूर्व विजय मिळाला असून अनेक विरोधकांचे किल्ले उध्वस्त झाले आहेत. सावनेर नगरपालिका आपण काँग्रेसमुक्त केली आहे. तसेच विरोधी पक्षाच्या सगळ्या नेत्यांच्या बालेकिल्ल्यांना आपल्या नेत्यांनी उध्वस्त केले. या सगळ्याच्या अभिनंदनाचा मानकरी मी नसून तुम्ही सगळे आहात,” असेही ते म्हणाले. (Devendra Fadnavis)
“नागपूर जिल्ह्यातील या २७ शहरांमध्ये चांगला विकास करण्याची जबाबदारी आम्ही घेतली असून भाजपच्या २२ शहरांना मॉडेल शहरे कशी करता येतील, हा प्रयत्न आपण करू. नागरी जीवनात गुणात्मक परिवर्तन आपण घडवू. या निकालांचे प्रतिबिंब महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये उमटवू. आपला हा विजयाचा रथ सगळीकडे सुरुच राहील. पण कुठल्याही विजयाने आपण मातणार नाही, हा आपला संकल्प आहे. विजय हा आपल्या कामाची पावती समजून अधिक लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने येत्या काळात प्रयत्न करायचे आहे,” असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....