Sanjay Raut meets Raj Thackeray : पालिका निवडणुका जाहीर होताच संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, ठाकरे बंधूंच्या युतीवर चर्चेला वेग?

16 Dec 2025 12:25:12
 
Sanjay Raut meets Raj Thackeray
 
मुंबई : (Sanjay Raut meets Raj Thackeray) महापालिका निवडणुकांची घोषणा होताच राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला असून, याच पार्श्वभूमीवर मंगळवार, १६ डिसेंबर रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Sanjay Raut meets Raj Thackeray) यांची भेट घेतली. शिवतीर्थावर झालेल्या या भेटीमुळे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबतच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. संजय राऊत यांच्यासोबत शिवसेनेचे नेते अनिल परब देखील या भेटीसाठी उपस्थित होते. (Sanjay Raut meets Raj Thackeray)
 
हेही वाचा :  ‘एमआयएम’चे मनसुबे
 
गेल्या काही महिन्यांपासून मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढणार का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र आतापर्यंत युतीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती. पालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर संजय राऊत आणि राज ठाकरे यांची ही पहिलीच प्रत्यक्ष भेट असल्याने, आता संपूर्ण महाराष्ट्राचे आणि विशेषतः राजकीय नेत्यांचे लक्ष या भेटीकडे लागले आहे. (Sanjay Raut meets Raj Thackeray)
 
हे वाचलात का ?: ऑस्ट्रेलियाचे आता तरी डोळे उघडणार का? 
 
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अर्धा तासाहून अधिक काळ तिघांमध्ये सविस्तर चर्चा सुरू होती. या चर्चेत पालिका निवडणुकांची रणनीती, राजकीय समीकरणे आणि भविष्यातील संभाव्य आघाडी यावर विचारमंथन झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासोबतच, ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेची तारीख आज किंवा लवकरच निश्चित होऊ शकते, असेही म्हटले जात आहे. जर ठाकरे बंधू एकत्र येण्याची अधिकृत घोषणा झाली, तर येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये राज्याच्या राजकारणावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याच माध्यमांवरून सांगण्यात येत आहे. (Sanjay Raut meets Raj Thackeray)
 
 
Powered By Sangraha 9.0