TET Exam : TET पेपर फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; कोल्हापूरातून ९ जणांना अटक

23 Nov 2025 13:19:55
TET Exam
 
मुंबई : (TET Exam) सध्या राज्यभर शिक्षक (TET Exam) पात्रता परीक्षा सुरू असतानाच, या परीक्षेचा पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय. मुरगुड पोलीस आणि गुन्हे अन्वेषण पथकाकडून ९ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आज रविवार दि. २३ नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यभरामध्ये शिक्षक (TET Exam) पात्रता परीक्षा सुरू आहेत. त्यातच आत या टोळीला पकडण्यात आले आहे. मुरगुड पोलीसांकडून या टोळीचा गांभीर्याने तपास घेतला जात आहे आणि या टोळीची व्याप्ती फार मोठी असू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (TET Exam)
 
हेही वाचा :  पांढरपेशा दहशतवाद : आव्हाने आणि सर्वसमावेशक उपाययोजना
 
राज्यभर सुरू असलेल्या शिक्षक (TET Exam) पात्रता परीक्षेसाठी राज्यभरातून लाखो शिक्षक समाविष्ट झाले असून, अनेक परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा सुरळीत सुरू आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेपर फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सध्या या सर्व प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. (TET Exam)
 
हे वाचलात का ? :  ‘रा. स्व. संघाचा गोतावळा’ : आवर्जून वाचावे असे पुस्तक
 
दरम्यान, ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये काही शिक्षकांचा समावेश असल्याचे देखील म्हटले जात आहे. ताब्यात घेतलेले सर्व आरोपी हे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातले आहेत. माध्यामांवरून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीसांकडून काल रात्रीपासून या घटनेचा तपास सुरू असून, यातीस संशयित आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. (TET Exam)
 
Powered By Sangraha 9.0