८ महिलांसोबत लग्न करून सलीमने चालू केला वेश्या व्यवसाय; पत्नीने केली पोलिसात तक्रार

03 Jun 2024 12:38:27
Marriege
 
लखनौ : उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातून तिहेरी तलाकचे प्रकरण समोर आले आहे. येथे पीडितेने तिच्या पतीवर वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. आरोपी पतीच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीही पीडितेचा छळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. ही घटना शुक्रवार, दि. १७ मे २०२४ घडली. या प्रकरणाबाबत तक्रार करण्यात आली होती, ज्यावर पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.
 
हे प्रकरण मुरादाबाद जिल्ह्यातील माझोला पोलीस स्टेशन परिसरातील आहे. शुक्रवारी पीडितेने पती सलीम विरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, सहा वर्षांपूर्वी तिचा विवाह मुरादाबादच्या कटघर भागात राहणाऱ्या सलीमसोबत झाला होता. लग्नानंतर महिलेला समजले की, याआधीही सलीमने सात लग्न केले होते. फसवणूक आणि बनाव करून त्याने आठवे लग्न केले होते. लग्नानंतर सलीमने पत्नीला रोज मारहाण करण्यास सुरुवात केली. आई-वडिलांची गरिबी पाहून पीडितेने काही दिवस मूकपणे सर्व काही सहन केले.
 
हे वाचलंत का? -  १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपी मोहम्मद खानची तुरुंगात हत्या; नाल्याच्या झाकणाने केला हल्ला
 
पीडितेने फिर्यादीत पुढे म्हटले आहे की, सलीमला दारू पिण्याचे आणि जुगार खेळण्याचे व्यसन आहे. पत्नीला वेश्याव्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न केला. बाहेरील मुलांना बोलावून सलीमने पीडितेला त्यांच्यासोबत झोपायला लावले. पीडितेने आपल्या पतीचा व्यवसाय म्हणजे मुलींशी लग्न करणे आणि त्यांची विक्री करणे असे सांगितले आहे. सलीमला पत्नीला पुढे करून शेजाऱ्यांविरुद्ध खोटी एफआयआर नोंदवायची होती. पैसे उकळण्यासाठी त्याला हे करायचे होते. महिलेने तसे करण्यास नकार दिल्याने तिला मारहाण करण्यात आली.
 
महिलेच्या म्हणण्यानुसार, दि. ५ ऑगस्ट २०२३ रोजी सलीमने तिला तिहेरी तलाक दिला आणि घरातून हाकलून दिले. निराधार झाल्यानंतर पीडितेने मुरादाबाद येथे तिच्या मावशीचे घर गाठले आणि कसे तरी तिथे राहू लागली. दि. १७ मे २०२४ रोजी ती तिच्या मावशीच्या घरी होती, तेव्हा तिचा पती सलीम आणि त्याचा भाऊ गुड्डू आणि मेहुणा नईम तेथे आले. या सर्वांच्या हातात पिस्तूल होते, असा आरोप आहे. या सर्वांनी घरात घुसून पीडितेला शिवीगाळ करत जबरदस्तीने सोबत नेण्यास सुरुवात केली.
 
हे वाचलंत का? -  धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप; १००हून अधिक कट्टरपंथीयांनी केला तरुणाच्या घरावर हल्ला
 
महिलेने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिल्याने तिला सलीम, गुड्डू आणि नईम यांनी बेदम मारहाण केली. आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले तेव्हा आरोपी पळून गेले. निघताना त्याने पीडितेवर ॲसिड टाकण्याची धमकीही दिली. आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी महिलेने केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी सलीम, गुड्डू आणि नईम यांच्या नावावर एफआयआर नोंदवला आहे. या सर्वांविरुद्ध तिहेरी तलाक २०१९ कायद्याच्या कलम ३/४ सह आयपीसीच्या कलम ४९८-अ, ३२३, ५०४ आणि ५०६ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0