सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या मानकरी ठरल्या तब्बल ६ जणी, ‘बाईपण’ची उत्तुंग भरारी!

06 Mar 2024 14:35:24
झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरल्या तब्बल ६ दिग्गज अभिनेत्री
 

zee awards 
 
 
मुंबई : झी गौरव पुरस्कार (Zee Chitra Gaurav) सोहळा प्रत्येक कलाकारांसाठी मानाचा पुरस्कार सोहळा आहे. ५ मार्च रोजी झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा मुंबईत संपन्न झाला. यावेळी वर्षभरात प्रदर्शित होणाऱ्या आणि प्रेक्षकांची मने जिकंणाऱ्या कलाकारांना पुरस्काराच्या स्वरुपात त्यांच्या कामाची पोचपावती मिळते. यंदाच्या झी चित्र गौरव (Zee Chitra Gaurav) पुरस्काराचे एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. साधारणत: सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार एक किंवा दोन जणांमध्ये विभागून दिला जातो. पण यावेळी हा पुरस्कार (Zee Chitra Gaurav) एक दोन नव्हे तर चक्क ६ अभिनेत्रींना देण्यात आला आहे.
 
हे वाचलंत का? -  'बाईपण भारी देवा' हा चित्रपट फक्त बायकांनी नाही तर प्रत्येक पुरुषांनीही पाहायला हवा!
 
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ६ जणी कोण? तर हो त्याच सहा बहिणी ज्यांनी आपली स्वत:ची गोष्ट सांगत प्रेक्षकांची मने जिकंली. या सहाजणी म्हणजे केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील ६ दिग्गज अभिनेत्री. या सहा जणींना त्यांच्या हक्काची ट्रॉफी देत त्यांचे कौतुक यहा सोहळ्यात करण्यात आले. तर हा सर्वोतक्ष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार सुकन्या मोने. दीपा परब, वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि रोहिणी हट्टंगडी' यांना देण्यात आला आहे.
 
हे वाचलंत का? - आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘बाईपण...’ चित्रपटाची ८३ कोटींची यशस्वी कमाई  
 
पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेत्री सुकन्या यांनी एक पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे. त्या लिहितात, 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार.... झी गौरव.... आम्हा सगळ्यांना मिळाला आणि त्याचप्रमाणे तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांनी जो उत्तुंग प्रतिसाद आम्हाला दिलात त्यामुळे सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट पुरस्कार... झी गौरव... ही आम्हाला म्हणजेच तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या चित्रपटाला ' बाईपण भारी देवा! 'ला. असेच प्रेम,आशीर्वाद आयुष्यभर आमच्या बरोबर असू देत. कायम. खास करून तमाम महिलांना मानाचा मुजरा ज्यांनी आम्हाला हा आनंद ,हे उत्तुंग यश दाखवलं.'
 

sukanya mone 
 
दरम्यान, ३० जुन २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने हळूहळू बॉक्स ऑफिसची गाडी पकडली आणि प्रेक्षकांच्या मनातही जागा निर्माण केली. या दरम्यान, प्रदर्शित झालेल्या अनेक हिंदी चित्रपटांना देखील ‘बाईपण’ने तोडीस तोड टक्कर दिली होती. या चित्रपटाने आत्तापर्यंत ९० कोटींच्या पुढे बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0