शिंदेंची रिक्षा, ठाकरेंची मर्सिडीज आणि फडणवीसांचा माईक!

    06-Jul-2022
Total Views |
 y
 
 
 
 
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रिक्षावाला असा उल्लेख केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात रिक्षा विरुद्ध मर्सिडीज असा कलगीतुरा रंगलाय. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना रिक्षावाला असे हिणवले आहे का? रिक्षा विरुद्ध मर्सीडिज या वादाची ठिणगी आता कुठपर्यंत जाणार?
 
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे.. 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना महिला आघाडीच्या बैठकीत काही वक्तव्य केली. काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती. त्याला ब्रेक नव्हता, सुसाट सुटला होता. अपघात तर होणार नाही ना? असं टेन्शन सगळ्यांना आलं होतं. आज काल माईक खेचला, उद्या काय खेचतील माहीत नाही. गद्दारांच्या डोळ्यात विकृत हसू आहे आणि शिवसैनिकांच्या डोळ्यात आसू आहे. ज्या राष्ट्रवादीच्या शरद पवारांवर विश्वास ठेवू नका, असं सांगितले होते, ते आज सोबत आहेत आणि ज्यांच्यावर विसंबून राहिलो त्यांनी दगा दिला.
 
 
महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अत्यंत गरिबीतून आज इथवर आले आहेत. ते काही आदित्य ठाकरे यांच्या प्रमाणे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या नाहीत. अत्यंत हलाखीची परिस्थिती असतानाही, कोणत्याही प्रकारची लांडी-लबाडी किंवा चोरी न करता शिंदेनी रिक्षा, टेम्पो, मजुरी करून, प्रसंगी मासे सोलून, मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबियांचे पोट भरले. हे करत असताना शिंदेनी शिवसेनेच्या कामात कधीही खंड पडू दिला नाही. याबद्दल खर तर त्यांचे कौतुक करायला हवे. पण ते सोडून उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री शिंदेंची रिक्षावाला अशी हेटाळणी करून एक प्रकारे कष्टकरी वर्गाचा अपमान केलाय का असा प्रश्न उपस्थित होतो.
 
उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे चिरंजीव होते, म्हणूनच ते शिवसेनाप्रमुख होऊ शकले. शिंदेचे वडील एक सर्वसामान्य कामगार किवा कष्टकरी होते त्यामुळे परिस्थितीमुळे जे ताटात पडले, त्याचा बाऊ न करत असताना शिंदेनी आपलं साम्राज्य उभं केलं. आजही एक जुना टेम्पो शिंदेनी आपल्या वाहनाच्या ताफ्यात उभा ठेवलाय. यावरून शिंदेना परिस्थितीची जाण आहे हे दिसून येत.
 
 
काल माईक खेचला, उद्या काय खेचतील माहीत नाही 
हे वक्तव्य करून उद्धव ठकरेनी मुख्यामंत्र्यांना दगाफटका होईल असं सूचित केलेले आहे. पण उद्धव ठाकरे ज्यांचा उल्लेख रिक्षावाला करतात त्याच रिक्षावाल्यानं ठाकरे सरकारला ब्रेकच लावला आणि स्वतः मुख्यमंत्रीपदाच्या ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसले सुद्धा. आता एकेकाळी रिक्षा चालवणारा हा सामान्य शिवसैनिक थेट राज्याचा मुख्यमंत्री झालाय, याचाच अर्थ राजकारणातले छक्के पंजे शिंदेना चांगलेच माहित असणार. बर सल्ला कोण देत आहेत तर ज्यांना स्वपक्षाचे ४० आमदार सांभाळता आले नाहीत ते.
 
 
गाद्दरांच्या डोळ्यात विकृत हसू आहे आणि शिवसैनिकांच्या डोळ्यात आसू आहे.
एका प्रश्नाबद्दल अनेकांना कुतूहल असेल ते म्हणजे शिवसेना सोडली कि तो माणूस रातोरात गद्दार कसा होतो या प्रश्नाचं. आता जुन्या कार्यकर्त्याला डावलून केवळ आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघाची सोय व्हावी म्हणून राष्ट्रवादीतून सेनेत इम्पोर्ट केलेले आणि विधानपरिषदेवर पाठवलेले सचिन अहिर यांना निष्ठावंत शिवसैनिक म्हणायचे? कि कॉंग्रसमधून आयात करून शिवसेनेने थेट राज्यसभेवर पाठवलेल्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांना निष्ठावंत शिवसैनिक म्हणायचे? हा प्रश्न उपस्थित होतो. रस्त्यावर लढायला शिवसैनिक हवा आणि विधानपरिषद आणि राज्यसभेवर जाणार ते बाहेरून आलेले नेते? त्यामुळे नेमकं कोण गद्दार आणि कोणाचे आसू हा प्रश्न उपस्थित होतो.
 
 
ज्या राष्ट्रवादीच्या शरद पवारांवर विश्वास ठेऊ नका असं सांगितल होत, ते आज सोबत आहेत आणि ज्यांच्यावर विसंबून राहिलो त्यांनी दगा दिला.
पुलोदचे विसर्जन करून शरद पवार जेव्हा कॉंग्रेसमध्ये दाखल झाले होते तेव्हा त्यांच्याच जवळच्या सहकाऱ्याने "आम्ही साहेबांच्या मागे उभे राहिलो आणि साहेब आमचं जहाज आणि आम्हाला सोडून कॉंग्रेसमध्ये गेले", अशा अर्थचं वक्तव्य केलेले होते. त्यामुळे, काल परवा मुख्यमंत्री कोणाला बनवायचा, हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे, असे वक्तव्य करून हात वर करणारे पवारसाहेब जर ठाकरेंना जवळचे वाटत असतील तर कठीण आहे.
शरद पवारांबद्दल खुद्द बाळासाहेबांनी काय वक्तव्य केलीत आणि का केलीत हा इतिहास उद्धव ठाकरेंनी तपास
गरजेचा आहे. उद्धव ठाकरेंना "रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!! हे शिंदेनी दिलेलं उत्तर खूप महत्वाच आहे त्याचा विचार उद्धव ठाकरेंनी केल्यास पक्ष गळती थांबेल. कारण नुकतेच ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या खासदाराने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत उमेदवाराला पाठींबा द्यावा असे पत्राद्वारे कळवलेले आहे.
लेखक - निनावं
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.