तबलिघी आढळलेल्या भागात डॉक्टरांवर दगडफेक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Apr-2020
Total Views |
Lakhnow-Tablighi-_1 
 
 


आम्हाला आमच्या आरोग्याची पर्वा नाही, डॉक्टरांना दिली उद्धट उत्तरे



लखनऊ : एकीकडे तबलिघी जमातींतर्फे आरोग्य कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले जात आहे, तर दुसरीकडे पुन्हा एकदा डॉक्टरांच्या टीमवर हल्ला झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या कसाईबाडा भागात स्थानिकांनी हा हल्ला केला आहे. दरम्यान, याच भागात १२ तबलिघी कोरोना रुग्ण आढळले होते.


देशभरात कोरोना पसरवण्यासाठी तबलिघी कारणीभूत असल्याचा अहवाल केंद्र सरकारने केला आहे. तसेच ज्यांना क्वारंटाईन करण्यात आले त्या तबलिघींनी महिला कर्मचारी आणि डॉक्टरांशी गैरवर्तन केले होते. डॉक्टरांवर थुंकणे, नर्ससमोर नग्नावस्थेत फिरणे, खाण्यासाठी बिर्याणीची मागणी करणे, असे प्रकार यापूर्वी तबलिघींनी केले होते. मध्यप्रदेशमध्ये तबलिघी घुसलेल्या भागांत तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांवर दगडफेक करण्यात आली.


रविवार, दि. ५ एप्रिल रोजी लखनऊतील कसाईबाडा येथे आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक सर्वेक्षणासाठी पोहोचले. तर काही स्थानिकांनी त्यांच्यावर हल्ला केला. हा तोच भाग होता ज्या ठिकाणी १२ तबलिघी कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र राबणाऱ्या या आरोग्य कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. कसाबसा जीव वाचवून ते पळाले. काही लोकांनी सुरुवातीला शिव्या देण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी मारण्यासाठी दगड उचलले.

'तुम्ही इथून निघून जा आम्हाला आमच्या आरोग्याची पर्वा नाही.', असे म्हणत शिव्या देत होते, अशी तक्रार आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली आहे. कसाईबाडा या भागातील एका मशिदीत कित्येक तबलिघी जमातीच्या मुस्लीमांना पकडण्यात आले होते. अनेकांना कोरोनाची लक्षणे आहेत तर काही जण कोरोना पॉझिटीव्ह आहेत. तरीही आरोग्य कर्मचारी या नागरिकांना वाचवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावून कोरोना चाचणी करण्यासाठी जात आहेत. मात्र, इथल्या लोकांनी त्यांच्याकडे असलेल्या वस्तूंची तोडफोड केलीच तसेच त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रेही फाडली. या प्रकारामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.














@@AUTHORINFO_V1@@