देश तुमचाही आहे ना ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Apr-2020   
Total Views |


tabaligi samaj_1 &nb




अगदी दोन महिन्यांपूर्वी हाच अशिक्षित, मागास, दुर्बल मुस्लीम समाज ‘नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे देशातील मुस्लिमांना कसे देशाबाहेर काढले जाणार आहे, यावर वकिली थाटात भाष्य करतानाही देशाने पाहिले आहे. तेव्हा हा ‘तबलिगी’, तो ‘सर्वसामान्य मुस्लीम’ असा भेद केल्याचे ऐकिवात नाही. म्हणजे सोयीसाठी ‘पॅन इस्लामीझम’ आणि अंगाशी आल्यास ‘पंथभेद’ हा कुटील डाव अल्लाचे नेक बंदे खेळत आहेत. मात्र, त्यांचे दुर्देव हे की, आता त्यांचा हा डाव देशातील बहुसंख्य हिंदूंसह अन्य अल्पसंख्याकांच्या व्यवस्थित लक्षात आला आहे.

 



स्थळ - भारत.


वेळ - कोरोना महासाथीचा सामना करण्यासाठीच्या लॉकडाऊनची.


काय घडले?

 


हे घडले - दिल्लीमध्ये तुघलकाबाद परिसरात असलेल्या उत्तर रेल्वेच्या दोन इमारती- डिझेल शेड ट्रेनिंग स्कूल आणि रेल्वे पोलीस दलाच्या (आरपीएफ) बराकींमध्ये. तबलिगी-ए-जमातच्या मुस्लिमांना ‘क्वारंटाईन’ आणि आवश्यक त्या उपचारांसाठी येथे ठेवण्यात आले होते. कोरोनाचे गांभीर्य पाहता सदर मुस्लिमांनी डॉक्टर, परिचारिका आणि तेथे कार्यरत आरोग्य कर्मचार्‍यांना सर्वतोपरी सहकार्य करणे गरजेचे होते. मात्र, अल्लाच्या त्या नेक बंद्यांनी उपस्थित डॉक्टर्सवर चक्क थुंकायला सुरुवात केली.



त्यानंतर अगदी अशीच घटना घडली उत्तर प्रदेशात. येथेही खलनायक होते ते अल्लाचे नेक बंदेच. गाझियाबादमधील एका इस्पितळात कोरोना चाचणी आणि ‘क्वारंटाईन’साठी दाखल करण्यात आलेल्या तबलिगी मंडळींनी वॉर्डमध्ये कमरेखालून नग्न अवस्थेत फिरण्यास प्रारंभ केला, तेथे उपस्थित असलेल्या परिचारिकांकडे पाहून अश्लील चाळे केले आणि निर्लज्जपणे फुंकण्यासाठी सिगारेटींची मागणी केली.

अशाच प्रकारची घटना मध्य प्रदेशात इंदूरमध्येही घडली. मुस्लीमबहुल वस्तीमध्ये काही आरोग्य कर्मचारी केले असता तेथेही अल्लाच्या नेक बंद्यांनी त्यांच्यावर दगडफेक सुरू केली. मुस्लिमांचा जीव वाचविण्यासाठी गेलेल्या त्या आरोग्य कर्मचार्‍यांना अखेरीस स्वत:चा जीव वाचवून तेथून पळून जावे लागले.

आता हे सर्व पाहून एक महत्त्वाचा प्रश्न पडतो. तो म्हणजे ‘हा देश आमचाही आहे’, ‘मुस्लीमही भारताचे नागरिक आहेत’, ‘मुस्लीमही भारतीय आहेत’, ‘गंगा-जमुनी तहजीब’ हेच भारताचे वैशिष्ट्य अशा प्रकारचे दावे नेहमी करण्यात येतात. त्यात जसे मुस्लीम बांधव असतात, तसेच पुरोगामी आणि लोकशाहीचे तारणहार म्हणविणारेही असतात. त्याचप्रमाणे मुस्लीम समाज हा मोठ्या संख्येने अशिक्षित आहे’, ‘तो मुख्य प्रवाहापासून दूर आहे’, ‘त्याच्यावर धर्माचा पगडा आहे’ असे मुद्देही काही झाल्यास हिरीरीने मांडले जातात. आताही मुस्लिमांच्या ‘थुंकमोहिमे’वर प्रश्न विचारल्यास ‘तबलिगी मुस्लीम कथित सर्वसामान्य मुस्लिमांपेक्षा कसे वेगळे आहेत’, ‘त्यांच्यामुळे संपूर्ण मुस्लिमांना कसा दोष देऊ नये’, ‘तबलिगींच्या परंपरा, मशिदी कशा वेगळ्या असतात’ याची ‘अरेबियन नाईट्स’च्या कथांप्रमाणे अगदी सुरस वर्णने केली जात आहेत. मात्र, अगदी दोन महिन्यांपूर्वी हाच अशिक्षित, मागास, दुर्बल मुस्लीम समाज ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’मुळे देशातील मुस्लिमांना कसे देशाबाहेर काढले जाणार आहे, यावर वकिली थाटात भाष्य करतानाही देशाने पाहिले आहे. तेव्हा हा ‘तबलिगी ’, तो ‘सर्वसामान्य मुस्लीम’ असा भेद केल्याचे ऐकिवात नाही. म्हणजे सोयीसाठी ‘पॅन इस्लामीझम’ आणि अंगाशी आल्यास ‘पंथभेद’ हा कुटील डाव अल्लाचे नेक बंदे खेळत आहेत. मात्र, त्यांचे दुर्देव हे, की आता त्यांचा हा डाव देशातील बहुसंख्य हिंदूंसह अन्य अल्पसंख्याकांच्या व्यवस्थित लक्षात आला आहे. त्यामुळे आता या मंडळींनी खरोखरच शहाणे होण्याची गरज आहे.



दिल्ली आणि त्यानंतर तबलिगींनी घातलेला गोंधळ, त्यांच्यामुळे कोरोना फैलावाचा वाढलेला धोका यावर मार्ग निघेलही. मात्र, मुस्लिमांच्या या वर्तनावर आता मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. दिल्लीमध्ये भरवस्तीत असलेल्या इमारतीतून जवळपास २१०० मुस्लिमांना बाहेर काढण्यात पोलिसांना अपयश येते. अपयश येते, कारण मुस्लीम सहकार्य करण्यास तयार नसतात. अखेरीस देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना पहाटे ३ वाजता तेथे दाखल व्हावे लागते आणि अखेरीस इमारत रिकामी करण्यास आणि ‘क्वारंटाईन’ व कोरोना चाचणी करण्यास मुस्लीम तयार होतात. त्यानंतर आणखीनच धक्कादायक माहिती हाती पडते. सुमारे ८२४ तबलिगी देशभरात धर्मप्रचारासाठी दहा दिवसांपूर्वीच बाहेर पडलेले असतात तर अन्य काही आपापल्या राज्यांमध्ये परतलेले असतात. त्यानंतर अचानक कोरोना बाधितांचा आकडा वाढण्यास सुरुवात होते. त्यानंतर देशभरातील मशिदींमध्ये लपवून ठेवलेल्या परदेशी मुस्लीम धर्मप्रचारकांची धरपकड करावी लागते. मात्र, तरीदेखील मुस्लीम स्वत:हून आरोग्य कर्मचारी अथवा पोलीस प्रशासनास सहकार्य करत नाहीत. उलट क्वारंटाईन म्हणजे मुस्लिमांना परस्परांपासून वेगळे करण्याचा डाव असल्याचे वेडगळ दावे सुरू केले जातात.



मात्र, यामध्ये दुर्लक्षित होतो तो मुस्लिमांचा धर्मप्रचार. तबलिगी मुस्लीम वर्षातले ४० वगैरे दिवस धर्मप्रचारासाठी देतात. आताही ८२४ तबलिगी देशभरात धर्मप्रचारासाठी गेले होते, त्यातले काही परदेशी तर काही भारतीय नागरिक असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे यातील परदेशी मंडळी पर्यटन व्हिसा (टुरिस्ट व्हिसा) काढून भारतात आली होती. त्यामुळे धर्मप्रचाराचे कामही खोटेपणाने करण्यात ही मंडळी तरबेज आहेत. हे नेमके किती वर्षांपासून सुरू आहे, हेदेखील आता स्पष्ट होईलच. महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये लपून बसलेले मुस्लीम धर्मगुरू धर्मप्रचारासोबत अन्यही काही करीत होते का? त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका संभवतो का? असे अनेक प्रश्न यामुळे ऐरणीवर आले आहेत. त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांनीही आता सावध राहणे गरजेचे आहे, आपल्या शहरात, परिसरात अशा प्रकारे परदेशी मुस्लीम आढळून आल्यास तत्काळ प्रशासनास कळविणे आता यापुढे गरजेचे झाले आहे. त्याचप्रमाणे ‘व्हिक्टिम कार्ड’ खेळण्याची सवय लागलेल्या मुस्लीम समाजाच्या प्रत्येक कृतीकडे आता काळजीपूर्वक पाहावे लागणार आहे. कारण, तुम्ही चांगल्या भावनेने जरी काही करायला गेलात, तरी तुमच्याविरोधात ते जाणार नाहीत याची खात्री देता येणे आता कठीण झाले आहे. संकटाच्या क्षणीही ते तुमच्यासोबत नाहीत, त्यामुळे परिस्थिती सर्वसामान्य झाल्यावर अत्याधिक काळजी घेणे आपल्या हातात आहे.



आम्ही दिवे पेटवू, तुम्ही थुंकत राहा...
 


कोरोना महासाथ आणि ‘लॉकडाऊन’ अशी परिस्थिती सध्या संपूर्ण जगामध्ये आहे. एकीकडे बाहेर गेल्यास जीवाची भीती आणि घरातच बसून येणारा कंटाळा यामुळे लोकांच्या मानसिकतेत नैराश्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे कोरोनाविरोधातला हा लढा दीर्घकाळ चालणार असल्याचे स्पष्ट आहे, त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सरकार करीतच आहे. मात्र, त्यासाठी देशातील जनतेचे मनोबल कायम राहणे फार गरजेचे आहे. त्यासाठी सध्याच्या परिस्थितीत काहीतरी करणं गरजेचे आहे. ‘लॉकडाऊन’ लागू होऊन आता दहा दिवस उलटले आहेत, निर्मनुष्य रस्ते आणि नैराश्यपूर्ण वातावरण सगळीकडेच आहे. अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी घरातील विजेचे दिवे बंद करून दिवा, पणती, मेणबत्ती अथवा अन्य साधनांनी काही मिनिटे प्रकाशपर्व तयार करणे, ही कल्पना अतिशय महत्त्वाची आहे. आपण सर्व एकमेकांसोबत आहोत आणि हे संकट आपण परतवून लावण्यात यशस्वी होऊ, हा संदेश देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी दिवा पेटविण्याचे आवाहन केले आहे. देशवासी त्याला योग्य तो प्रतिसाद देतील, यात कोणतीही शंका नाही.


मात्र, परंपरेप्रमाणे देशातील उरबडव्या मंडळींनी त्याविरोधात द्वेष व्यक्त करीत त्यांच्या एकांगी अजेंड्याचे ‘दिवे लावण्या’स सुरुवात केली आहे. ही मंडळी अल्लाचे नेक बंदे थुंकीमोहीम चालवित असताना गायब झालेली होती, हे विशेष. त्यामुळे आता देशासमोरील दुहेरी धोका कोणता, हे नेमकेपणाने ओळखून आवश्यक ते पाऊल टाकण्याची वेळ आली आहे.

 
 
@@AUTHORINFO_V1@@