ओंकार ओक

ओंकार ओक ‘दुर्गविहार’ या सदराचे लेखक ओंकार ओक सह्याद्रीतील गिर्यारोहण क्षेत्रात सन २००० सालापासून सक्रिय सहभागी असून, त्यांना २३ वर्षांचा ट्रेकिंगचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. महाराष्ट्रातील ३०० पेक्षा अधिक किल्ल्यांना त्यांनी भेटी दिल्या असून गडकिल्ले, घाटवाटा, इतिहास इत्यादींशी संबंधित त्यांचे जवळपास ५०० लेख प्रकाशित झाले आहेत. पुण्यातील गिर्यारोहकांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून नावाजल्या जाणार्या ‘पुणे भटकंती कट्टा’ या उपक्रमातील ते प्रमुख संचालक आहेत. महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर व ट्रेकिंगच्या इतर ठिकाणी होणार्या दुर्दैवी अपघातांदरम्यानच्या बचाव कार्य म्हणजेच रेस्क्यू ऑपरेशन समन्वयक व अनेक रेस्क्यू ऑपरेशन्सदरम्यानही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.