बीड: (Godavari River Boat Accident) जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे गोदावरी नदीत भाविकांनी भरलेली बोट उलटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक प्रशासन, बोटचालक आणि ग्रामस्थांच्या मदतीने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. (Godavari River Boat Accident)
प्राथमिक माहितीनुसार, बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवण्यात आले होते. दुर्घटनेतून बचावलेल्या एका महिलेने बोटीत सुमारे ५० ते ६० प्रवासी असल्याचा दावा केला आहे. अधिक मासानिमित्त पुरुषोत्तमपुरी येथे भाविकांची मोठी गर्दी झाल्याने नदीपार वाहतुकीसाठी बोटींचा वापर सुरू होता. (Godavari River Boat Accident)
२० जणांना सुरक्षित बाहेर काढले...
बोट उलटल्यानंतर नदीत पडलेल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. आतापर्यंत २० जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र बोटीत नेमके किती प्रवासी होते आणि किती जण अद्याप बेपत्ता आहेत याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. (Godavari River Boat Accident)
माध्यमांवरून मिळत असलेल्या माहितीनुसार, घटनेतून बचावलेल्या महिलेने गंभीर आरोप करत सांगितले की, बोटीत आधीच गर्दी असतानाही बोटचालकाने आणखी प्रवाशांना बसवले. "इतके लोक बसू शकतात का?" असा प्रश्न विचारला असता, "५० पेक्षा जास्त प्रवासी नेहमी बसतात" असे उत्तर देण्यात आले. काही प्रवासी उतरण्याचा प्रयत्न करत असतानाही त्यांना पुन्हा बोटीत बसवण्यात आल्याचा दावा तिने केला. (Godavari River Boat Accident)
अधिक मासानिमित्त पुरुषोत्तमपुरी परिसरात हजारो भाविक दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नदीपार जाण्यासाठी बोटींचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. अधिक प्रवासी वाहून नेऊन जास्त उत्पन्न मिळवण्याच्या उद्देशाने क्षमतेपेक्षा जास्त लोकांना बोटीत बसवण्यात आल्याने ही दुर्घटना घडल्याचे स्थानिकांचे मत आहे. (Godavari River Boat Accident)
घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. नदीपात्रात शोधमोहीम सुरू असून बेपत्ता प्रवाशांचा शोध घेतला जात आहे. अधिकृत आकडेवारी आणि बचावकार्याचा अंतिम अहवाल येणे अद्याप बाकी आहे. या दुर्घटनेमुळे नदी वाहतुकीतील सुरक्षाविषयक नियम आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Godavari River Boat Accident)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.