राज्यात लागू केलेल्या त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच, "एका समितीची स्थापना केली असून या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील भूमिका ठरवली जाईल,” अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. "हिंदी भाषा विषय लागू करण्याबाबतच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी रविवार, दि. २९ जून रोजी मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठकपार पडली.
Read More
महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात राज ठाकरेंनी राज्यतील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहिले आहे. हिंदी भाषेच्या सक्तीचा प्रश्नच येत नाही, कारण हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, असे ते म्हणाले. बुधवार, १८ जून रोजी पत्रकार परिषद घेत त्यांनी या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला.
काँग्रेसच्या कार्यकाळात इंग्रजी ही द्वितीय भाषा म्हणून आली मग तीही रद्द करायची का? असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना केला आहे. तसेच भाषेचे राजकारण सोडा आणि वस्तुस्थिती पाहा, असा सल्लाही त्यांनी दिला.
राज्यभरात सध्या शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीवरून गोंधळ सुरु असताना आता शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार तिसरी भाषा शिकवण्याचे नियोजन केले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मराठी भाषेबद्दल कुणीचीही तडजोड नाही. पण हिंदी भाषासुद्धा प्रत्येकाला आली पाहिजे, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवार, १९ एप्रिल रोजी दिली. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Compulsion Hindi Language नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत राज्यात इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय जाहीर होताच, भाषिक राजकारणही पेटले. या विषयावर समाजमाध्यमांमध्येही वाद-प्रतिवाद सुरू आहेत. यानिमित्ताने भाषा, संस्कृती, साहित्य यांच्यातील परस्पर संबंध, शिक्षणातील त्रैभाषिक सूत्र याविषयीचे विविध कंगोरे ज्येष्ठ लेखक, माजी प्राचार्य आणि ‘साहित्य भारती, महाराष्ट्र’चे कार्याध्यक्ष नरेंद्र पाठक यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत उलगडून सांगितले.
Hindi आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी तामिळनाडूवर ढोंगीपणाचा आरोप करण्यात आला आहे. ते म्हटले की, त्यांचे नेते आर्थिक फायद्यासाठी त्यांचे तमिळ चित्रपट आतापर्यंत हिंदी भाषेत डब करत होते. पक्षाच्या स्थापना दिनी बोलताना जनसेवा प्रमुख म्हणाले की, देशाच्या अखंडतेसाठी भारताला तमिळसह अनेक भाषांची आवश्यकता आहे.
Amit Shah तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी हिंदी भाषेविरोधात फतवा काढला असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. हिंदी भाषेमुळे तमिळ भाषेकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्टॅलिन यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: एमके स्टॅलिन यांना सांगितले की, राज्यात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण हे तमिळ भाषेत सुरू करावे. ७ मार्च २०२५ रोजी रानीपेट जिल्ह्यातील थाकोलममधील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ५६ व्या स्थापन दिनाच्या समारंभात अमित शाह यांनी संबोधित केलं.
Hindi या देशात हिंदू संस्कृतीवर आघात करण्याची एक वेग़ळीच परंपरा आहे. आक्रांतांनी सुरु केलेल्या या परंपरांचे प्रामाणिक पाईक आजही भारतात आहेत. मात्र, आता विरोध थेट न करता, तो विविध रंगाढंगात केला जातो. विविध रुपांच्या माध्यमातून या पाईकांचा विरोध पुढे येतो. प्रादेशिक अस्मिता हे त्यापैकीचे एक कारण. भारतासारख्य विविधता असलेल्या देशात प्रादेशिक अस्मिता नक्कीच चूक नाही, मात्र त्याचा वापर स्वार्थासाठी व्हावा हे दुर्दैव. नेमके हेच स्टॅलिन यांना न उमगल्याने, त्यांनी हिंदी भाषेला विरोध आणि त्याच्या आडून संस्कृत भाषा आ
आपलीही मुलं महागड्या शाळांमध्ये शिक्षण घेतात. तिथेही हिंदी, इंग्रजी आणि तमिळ भाषेचे ज्ञान दिले जाते. याला आता अन्नामलाईंनी द्रमुकचे ढोंग आहे का? प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सुनावले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० वरून तामिळनाडूत मोठा वादंग निर्माण झाला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे नेते एमके स्टॅलिन यांनी या धोरणाविरूद्ध आवाज उठवला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे धोरण तामिळनाडूवर हिंदी भाषा लादण्याचे षडयंत्र असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी हिंदी भाषेत देशात ऐक्य निर्माण करण्याची क्षमता असण्यावर भर दिला.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा सुधारीत मसुदा मानव संसाधन विकास मंत्रालयाने जारी केला