मुंबई: (Dhule Laling Ghat Accident) धुळे शहरानजिकच्या लळिंग घाटात सोमवारी २५ मे रोजी पहाटे एक भीषण अपघात घडल्याची माहिती आहे. यात वाळू वाहतूक करणारे दोन ट्रक आणि खाजगी ट्रॅव्हल (तिरखर बस) यांची तिहेरी धडक झाली. या घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून, २६ जण जखमी झाले आहेत. (Dhule Laling Ghat Accident)
दरम्यान माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून एकूण ३२ जणांना तातडीने धुळे येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय रुग्णालयात आणण्यात आले, पण त्यापैकी ६ जणांचा रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय स्रोतांनी दिली. (Dhule Laling Ghat Accident)
या ६ मृतांपैकी आतापर्यंत फक्त एकाच व्यक्तीची ओळख पटली आहे. त्याचे नाव मनोज प्रकाश नरवाळ असे असून, ते ट्रकचालक होते. मनोज हे मालेगाव येथील रहिवासी आहेत. उर्वरित ५ मृतांची ओळख पटवण्याचे काम प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. (Dhule Laling Ghat Accident)
या अपघातात गंभीर आणि किरकोळ जखमी झालेल्या २६ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. डॉक्टरांच्या माहितीनुसार, सर्व २६ जणांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर आवश्यक ते उपचार सुरू आहेत आणि बाधित कुटुंबियांना सहाय्य आणि माहिती देण्याचे काम रुग्णालय प्रशासन करत आहे. (Dhule Laling Ghat Accident)
Six killed, 20 injured in Multi-Vehicle Crash on #MumbaiAgraHighway at Laling Ghat in Dhule
According to police, a Dumper Truck laden with sand was driving on the wrong side of the highway through #LalingGhat and collided head-on with a container truck heading toward #Dhule… pic.twitter.com/Cq6af6VGyr
घटनेची माहिती मिळताच धुळे पोलीस प्रशासन घटनास्थळी आणि रुग्णालयात दोन्ही ठिकाणी दाखल झाले. त्यांनी ट्रक चालक, ट्रॅव्हल ड्रायव्हर आणि घटनास्थळाची सीसीटीव्ही तपासणी सुरू केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, रात्रीचा अंधार, घाटातील वळणे आणि वेग यामुळे हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. (Dhule Laling Ghat Accident)
रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात रविवारी २४ मे रोजी रात्री एक भीषण अपघात घडला आहे. महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यान असलेल्या घाटात पर्यटकांची एक स्कॉर्पिओ गाडी अनियंत्रित होऊन थेट ७०० ते ८०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात गाडीतील सर्व ८ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. हे सर्व पर्यटक सातारा जिल्ह्यातील नागरिक असल्याचे समजते.
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.