रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळून ८ जणांचा जागीच मृत्यू....

Total Views |
 
Ambenali Ghat accident
 
मुंबई: (Ambenali Ghat accident) रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात रविवारी २४ मे रोजी रात्री एक भीषण अपघात घडला आहे. महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यान असलेल्या घाटात पर्यटकांची एक स्कॉर्पिओ गाडी अनियंत्रित होऊन थेट ७०० ते ८०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात गाडीतील सर्व ८ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. हे सर्व पर्यटक सातारा जिल्ह्यातील नागरिक असल्याचे समजते. (Ambenali Ghat accident)
 
आंबेनळी घाट आणि थेंबूस घाट यांचा संयोग असलेला हा भाग दुर्गम आणि तीव्र वळणांनी भरलेला आहे. अंधारात वीकेंडच्या सुट्टीनंतर आपल्या गावी परतत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. (Ambenali Ghat accident)
 
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच रायगड पोलीस आणि स्थानिक रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, ७००–८०० फूट खोल दरी आणि रात्रीचा अंधार यामुळे बचाव कार्यात अनेक अडथले निर्मान झाले. सोमवारी सकाळपर्यंत दोन मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले असून, उर्वरित ६ मृतदेह निक्षिप्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. (Ambenali Ghat accident)
 
आतापर्यंत माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही स्कॉर्पिओ गाडी सातारा जिल्ह्यातील पासिंगची असून, त्यात सातारा शहर, आसगाव आणि कोरेगाव परिसरातील पर्यटक होते. वीकेंड सुट्टी घालवण्यासाठी महाबळेश्वरच्या परिसरात ते आले होते. त्यांची नावे आणि घटनेचे नेमके कारण याबाबत अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पोलिस सध्या मृतांची ओळख पट‍वून, त्यांच्या नातेवाईकांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. या अपघाताने पुन्हा एकदा घाट प्रवासातील सुरक्षेची चिंता निर्माण केली आहे. (Ambenali Ghat accident)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com