मराठी स्टार्स आता मैदानात उतरणार! 'रंगकर्मी क्रिकेट लीग २०२६' ची धमाल सुरुवात...

Total Views |
 
Rangkarmi Cricket League 2026
 
मुंबई: (Rangkarmi Cricket League 2026) मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणणारी बहुचर्चित ‘रंगकर्मी क्रिकेट लीग २०२६’ आता आधिकच रंगतदार होणार आहे. मंगेश सांगळे फाउंडेशन प्रस्तुत १४ आणि १५ मे २०२६ रोजी परळ येथील सेंट्रल रेल्वे ग्राऊंडवर आयोजित करण्यात आलेल्या या लीगच्या ट्रॉफी आणि अधिकृत टी-शर्टचे शानदार अनावरण नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या सोहळ्यात अनेक कलाकार, मान्यवर आणि क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Rangkarmi Cricket League 2026)
 
दरम्यान, राजकीय नेते श्रीकांत भारतीय आणि मंगेश सांगळे यांच्या विशेष उपस्थितीत अतिशय उत्साहात या लीगच्या ट्रॉफी आणि टीशर्ट लॉन्चचा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘कलाकारांमध्ये मैत्री आणि क्रीडाभावना वाढवण्यासाठी अशा उपक्रमांची खरोखर गरज आहे. त्यासोबतच, मराठी कलाकारांचा हा अनोखा क्रिकेट महोत्सव अनुभवण्यासाठी क्रिकेटप्रेमी आणि चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. (Rangkarmi Cricket League 2026)
 
हेही वाचा: लाल किल्ल्यावर जनजातीय संस्कृतीचा विराट संगम! 
 
या लीगमध्ये एकूण ६ संघ असून त्या संघांचे नेतृत्व लोकप्रिय कलाकारांकडे सोपविण्यात आले आहे. प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांच्या नेतृत्वाखाली ‘मराठा रायझिंग’, संचित यादव यांच्या नेतृत्वाखाली ‘वीर मराठा’ हे संघ मैदानात उतरणार आहेत. तसेच नुपूर दुधवडकर ‘मर्द मराठा’ संघाची धुरा सांभाळणार आहेत. हरीश दुधाडे ‘स्टार मराठा’ संघाचे नेतृत्व करणार असून कांचन पगारे ‘मराठा शिलेदार’ आणि सागर कारंडे ‘मराठा वॉरियर’ संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहेत. (Rangkarmi Cricket League 2026)
 
१४ आणि १५ मे ला रंगणाऱ्या ‘रंगकर्मी क्रिकेट लीग’च्या आयोजनामध्ये संचित यादव आणि शितल कल्लापुरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून त्यांच्या सहकार्याने आणि संपूर्ण टीमच्या मेहनतीमुळे कार्यक्रमाची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. यावेळी अधिकृत ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले तसेच विशेष डिझाइन केलेल्या आकर्षक टी-शर्टचे सादरीकरणही करण्यात आले. लीगसाठी पंडित राठोड, सचिन खंडागळे, संदीप राठोड, ओमकार सर आणि अखिलेश चौबे,भरत नाना पाटील यांचे प्रायोजक म्हणून विशेष सहकार्य लाभले आहे. (Rangkarmi Cricket League 2026)
 
मनोरंजन क्षेत्रातील मराठी कलाकारांना एकत्र आणून मैत्री आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्याचा या लीगचा मुख्य उद्देश असल्याचे मंगेश सांगळे आणि संचित यादव यांनी सांगितले. (Rangkarmi Cricket League 2026)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com