मोदींनी सांगितल्यानुसार जर एक वर्ष सोनं खरेदी न केल्यास सोन्याचे दर घसरणार? पण कसे? सविस्तर वाचा

Total Views |
 
Gold Price Prediction 2027 India
 
 
मुंबई: (Gold Price Prediction 2027 India) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका-इराण तणावामुळे जगभरात निर्माण झालेली परिस्थिती पाहता, देशाच्या आर्थिक स्थितीचा विचार करून परकीय चलन बचतीसाठी वर्षभर सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन देशवासियांना केलं आहे.
 
भारत हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा आयातदार असून, दरवर्षी ७००-८०० टन सोन्यावर कोट्यवधी रुपये खर्च होतात. ज्यामुळे चालू खात्याची तूट वाढते आणि रुपयावर दबाव येतो. त्यामुळेच सरकारचा विश्वास आहे की, जर नागरिक सोन्याऐवजी बँक योजना, शेअर बाजार किंवा इतर गुंतवणुकीच्या पर्यायांकडे वळले, तर देशाची अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकते. (Gold Price Prediction 2027 India)
 
भारतामध्ये लग्नसमारंभ, सण आणि गुंतवणूक यासाठी सोन्याची मोठी मागणी असते. ज्यामुळे मोठ्याप्रमाणावर सोन्याची आयात केली जाती. जर खरेदी कमी झाली तर, आयात कमी होईल, चालू खात्याचा तुटवडा कमी होऊ शकतो. त्यासोबतच, रूपयावरचा दबावही कमी होईल. (Gold Price Prediction 2027 India)
 
हेही वाचा: जगात सर्वाधिक सोनं कोणाकडे...? आणि सोनं खरेदी टाळण्याचं कारण काय? सविस्तर वाचा  
 
नागरिकांनी गुंतवणूक कशी करावी?
 
नागरिकांनी आपला पैसा सोन्याऐवजी बँकिंग साधनांमध्ये, शेअर बाजारात किंवा इतर आर्थिक योजनांमध्ये गुंतवावा. यामुळे देशातील पैसा देशातच फिरत राहील आणि विकासकामांना चालना मिळेल. पायाभूत सुविधा, शिक्षण, उद्योग आणि रोजगार निर्मिती यांसारख्या क्षेत्रांना याचा थेट फायदा होऊ शकतो. त्यामुळे हा निर्णय केवळ वैयक्तिक गुंतवणुकीपुरता मर्यादित न राहता, राष्ट्रीय आर्थिक धोरणाचा भाग म्हणून पाहिला जात आहे. (Gold Price Prediction 2027 India)
 
याशिवाय, सोन्याची आयात कमी झाल्यास डॉलरची मागणी घटू शकते. डॉलरची मागणी कमी झाली की रुपयाचे मूल्य तुलनेने मजबूत राहते. रुपया मजबूत झाल्यास आयात होणाऱ्या इंधनाच्या किमतींवरही सकारात्मक परिणाम होतो, ज्याचा थेट फायदा सर्वसामान्य नागरिकांना होऊ शकतो. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठीही हा एक महत्त्वाचा घटक ठरू शकतो. (Gold Price Prediction 2027 India)
 
तज्ज्ञांच्या मते, जर सोन्याची मागणी कमी झाली, तर स्थानिक बाजारात किमतींमध्ये काही काळासाठी घट दिसू शकते. मात्र, जागतिक पातळीवरील आर्थिक परिस्थिती, भू-राजकीय तणाव आणि डॉलरच्या हालचाली यावर सोन्याच्या किमती अवलंबून असल्याने दीर्घकालीन चित्र वेगळं असू शकतं. काही विश्लेषकांच्या मते, २०२७ पर्यंत १० ग्रॅम सोन्याची किंमत ८५,००० ते ९५,००० रुपयांपर्यंत जाऊ शकते. (Gold Price Prediction 2027 India)
 
दरम्यान, सरकारकडून नागरिकांना डिजिटल गोल्ड आणि सॉवरेन गोल्ड बॉण्ड्स (SGB) यांसारख्या पर्यायांकडे वळण्याचा सल्ला दिला जात आहे. या माध्यमातून गुंतवणूक केल्यास प्रत्यक्ष सोनं घरी साठवण्याची गरज राहत नाही आणि गुंतवणुकीवर व्याजाचाही लाभ मिळतो. त्यामुळे हा पर्याय अधिक सुरक्षित आणि फायदेशीर मानला जात आहे. (Gold Price Prediction 2027 India)
 
त्यामुळे पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनानुसार, जर नागरिकांनी वर्षभरासाठी सोन्याची खरेदी टाळली, तर त्याचा सकारात्मक परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर दिसून येऊ शकतो. ‘सुवर्ण उपवास’ म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या उपक्रमामुळे भारताची आर्थिक ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Gold Price Prediction 2027 India)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com