नाशिक: (TCS Nashik case) नाशिकमधील TCS प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून आता या प्रकरणाने अधिक गंभीर वळण घेतले आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांवर लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव आणल्याच्या आरोपांमुळे आधीच खळबळ उडालेली असताना, मुख्य आरोपी एचआर अधिकारी निदा खान अद्याप फरार आहे. पोलिसांच्या हाती लागण्यापासून वाचण्यासाठी ती सतत लोकेशन बदलत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणात मोठी कारवाई करत पोलिसांनी तिचा पती मोईन खान याला मुंब्रा येथून ताब्यात घेतले आहे. (TCS Nashik case)
माध्यमांवरून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंब्रा परिसरात छापा टाकण्यात आला होता. मात्र, त्याआधीच निदा खान तिथून निसटली होती. तरीही पोलिसांनी तिच्या पतीची चौकशी करत तिच्या हालचालींबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्राथमिक चौकशीत निदा खान नातेवाईकांकडे गेल्याचं सांगण्यात आलं असलं, तरी संबंधित नातेवाईकांचे फोन बंद असल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. याचदरम्यान, निदा खानने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली असून, तिच्या अर्जावर नाशिक न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. (TCS Nashik case)
या प्रकरणात आता ATS चीही एंट्री झाली आहे. ATS ने रजा मेनन आणि शफी शेख या दोघांना ताब्यात घेऊन जवळपास तीन तास कसून चौकशी केली. या चौकशीत आंतरराष्ट्रीय कॉल्स, संभाव्य फंडिंग आणि संशयास्पद संपर्कांबाबत प्रश्न विचारण्यात आले. विशेष म्हणजे, या प्रकरणाचा दिल्लीतील स्फोट प्रकरणातील आरोपीशी काही संबंध आहे का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा आवाका केवळ स्थानिक न राहता राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरत आहे. (TCS Nashik case)
दरम्यान, SIT तपासात एक महत्त्वाचा धागा हाती लागला आहे. आरोपींनी तयार केलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून कथित धर्मांतर कटाचा उलगडा झाल्याचा संशय आहे. अटक केलेल्या आरोपींचे मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करून त्यांचे डेटा क्लोनिंग करण्यात आले असून, त्यातून अनेक संशयास्पद चॅट्स समोर आले आहेत. या डिजिटल पुराव्यांच्या आधारे पीडितांना टार्गेट करून त्यांना फसवण्याचा संगनमताने प्रयत्न केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. (TCS Nashik case)
सध्या निदा खानच्या शोधासाठी SIT ची तीन स्वतंत्र पथके काम करत आहेत. तिच्या अटकेनंतर या प्रकरणातील सर्वात मोठे आणि धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे नाशिकसह संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून, आता सर्वांचे लक्ष पुढील कारवाईकडे लागले आहे. (TCS Nashik case)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.