Amravati sexual abuse scandal: अमरावती सेक्स स्कँडलमध्ये ‘लव्हगुरू’चा धक्कादायक खुलासा! अयान अहमदचा जाळा किती मोठा?

Total Views |
 
Amravati sexual abuse scandal
 
मुंबई: (Amravati sexual abuse scandal) अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे उघडकीस आलेल्या लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडीओ व्हायरल प्रकरणाने राज्यात खळबळ उडवली असून, या प्रकरणाचा तपास आता अधिक वेगाने सुरू आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीत दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याने तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी ‘लव्हगुरू’कडून विशेष टिप्स घेतल्याची माहिती समोर आली आहे. नियोजनबद्ध पद्धतीने संवाद साधत, विश्वास संपादन करून आणि मानसिकदृष्ट्या प्रभावित करत तो मुलींना आपल्या जाळ्यात ओढत होता, असे तपासात उघड झाले आहे. “हाय-हॅलो सोडा, आपण आधी भेटलो होतो ना?” अशा प्रकारच्या संवादातून तो मुलींशी ओळख वाढवत असे आणि त्यानंतर हळूहळू त्यांच्याशी जवळीक साधत त्यांचे शोषण करत असल्याचा आरोप आहे. (Amravati sexual abuse scandal)
 
SIT च्या तपासात आणखी एक मोठा खुलासा समोर आला असून, आरोपी अयानने आपल्या मित्र मानव सुगंधे यांच्या कथोरा रोडवरील भाड्याच्या फ्लॅटचा सात ते आठ वेळा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. या ठिकाणी तरुणींना नेऊन त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी फ्लॅट मालकाची चौकशी सुरू केली असून, या प्रकाराबद्दल त्याला माहिती होती का, याचा शोध घेतला जात आहे. (Amravati sexual abuse scandal)
 
हेही वाचा: TCS Nashik case: फरार एचआर निदा खानचा पती पोलीसांच्या ताब्यात; ATSची एंट्री, प्रकरणाला नवं गंभीर वळण!
 
याशिवाय, अयान तरुणींना भेटण्यासाठी कॅफेचाही वापर करत असल्याचे उघड झाले आहे. “द कॅफे रॉयल १०” या ठिकाणी तो मुलींना घेऊन जात असे आणि तिथे बसण्यासाठी कॅफे चालकाला पैसे देत असे, अशी माहिती समोर आली आहे. या कॅफेमध्ये कपल्ससाठी स्वतंत्र कंपार्टमेंट्स असल्याने तिथे संशयास्पद हालचाली होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून या कॅफे मालकांची चौकशी सुरू आहे. (Amravati sexual abuse scandal)
 
या प्रकरणाची पाळंमुळं आता वझ्झर डॅम परिसरापर्यंत पोहोचली आहेत. येथेच आरोपी आणि पीडित तरुणींची पहिली भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. तपास पथकाने या ठिकाणी जाऊन माहिती गोळा केली असून, संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत या प्रकरणात १० पेक्षा अधिक जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. (Amravati sexual abuse scandal)
 
दरम्यान, या प्रकरणातील अश्लील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. सायबर सेलच्या मदतीने पोलिसांनी आतापर्यंत ४१ अकाऊंट्स डिलीट केली आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलीग्राम आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवरून हे कंटेंट हटवण्यात आले आहे. तपास यंत्रणा प्रत्येक डिजिटल पुरावा तपासत असून, या प्रकरणामागील संपूर्ण रॅकेट उघड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Amravati sexual abuse scandal)
 
 

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com