मुंबई: (Ashok Kharat Case) मुंबईत पुन्हा एकदा भोंदू अशोक खरात प्रकरणाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात नवे गंभीर आरोप करत तपास यंत्रणांकडून सखोल चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी दावा केला की, अजित पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर १७ जानेवारी रोजी कथित भानामतीचा प्रकार घडत असतानाच, त्याच दिवशी अशोक खरात ठाण्यातील एका हॉटेलमध्ये उपस्थित होता आणि अवघ्या ३४ सेकंदांत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करण्यात आले. या दोन घटनांमधील संभाव्य संबंध तपासला जावा, अशी मागणी त्यांनी केली असून, अजित पवारांच्या अपघाताशी या घडामोडींचा काही संबंध आहे का, याबाबतही त्यांनी संशय व्यक्त केला आहे. (Ashok Kharat Case)
दमानिया यांनी पुढे सांगितले की, २७ ते २९ जानेवारीदरम्यान समता प्रतिष्ठानमध्ये तब्बल ५ कोटी ३३ लाख रुपयांचे व्यवहार झाले असून या पैशांचा स्रोत, उद्देश आणि त्यामागील व्यक्तींचा शोध घेणे अत्यावश्यक आहे. या व्यवहारांची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेमार्फत व्हावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार झाल्याबाबत पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, तिच्यावर योग्य वेळी पाळत ठेवली गेली नाही का, किंवा काहीजण तिला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. (Ashok Kharat Case)
या प्रकरणात दमानिया यांनी अनेक राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे नाव घेत खळबळ उडवली आहे. त्यांनी असा आरोप केला की, काही नेते केवळ भविष्य जाणून घेण्यासाठी खरातच्या संपर्कात होते, मात्र काही जण विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्याच्याकडे जात होते. विशेषतः रूपाली चाकणकर यांच्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांच्या फोन कॉल रेकॉर्डनुसार त्यांनी खरातशी १७७ वेळा संपर्क साधला होता आणि एका दिवशी तब्बल २२ मिनिटे संवाद झाला होता. याबाबत त्यांनी एसआयटीकडे चौकशीची मागणी केली आहे. (Ashok Kharat Case)
याशिवाय, दमानिया यांनी एकनाथ शिंदे, जयंत पाटील, सुनील तटकरे तसेच इतर अनेक नेते आणि अधिकाऱ्यांची नावे जाहीर करत, अशोक खरातच्या संपर्कजाळ्याचा विस्तार किती मोठा होता यावर प्रकाश टाकला. काही अधिकाऱ्यांचेही खरातशी निकटचे संबंध असल्याचा दावा त्यांनी केला असून, या सर्वांची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. (Ashok Kharat Case)
अंजली दमानिया यांनी खरातशी संपर्कात असलेल्या राजकारण्यांची नावे (Ashok Kharat Case)
- नितीन पवार
- चंद्रकांत पाटील आणि पीए देशपांडे
- उदय सांगळे
- पद्मश्री पोपटराव पवार
- दादा भुसेंचे पीए
- राहुल रोकडे, विखे पाटील यांचे पीए
- एकनाथ शिंदे
- प्रभाकर काळे
- सुनील तटकरे
- जयंत पाटील
- रुपाली चाकणकर
- मुलगा सोहम चाकणकर आणि इतर
अशोक खरातच्या कॉन्टॅक्टमध्ये अनेक प्रशासकीय अधिकारी होते (Ashok Kharat Case)
- दिपक लोंढे हे खरातच्या जवळचे आहेत.
- बाळासाहेब बोराडे
- नंदकिशोर काटोरे हे डॉक्टर आहेत.
- सचिन चुंबाळे
- मंगेश नवाळे
- राहुल देशमुख
- अविनाश पोटे
- कमलाकर पोटे
- महेंद्र शेळके-पाटील
एकूणच, अशोक खरात प्रकरण आता केवळ लैंगिक शोषण आणि फसवणुकीपुरते मर्यादित न राहता, आर्थिक गैरव्यवहार, राजकीय संबंध आणि संभाव्य मोठ्या रॅकेटच्या दिशेने वळताना दिसत आहे. दमानिया यांच्या आरोपांमुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले असून, तपास यंत्रणांवर आता सर्व आरोपांची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याचा दबाव वाढला आहे. (Ashok Kharat Case)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.