अमरावती हादरले; समाज माध्यमांद्वारे १८० अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण खा. अनिल बोंडे यांची पोलिसांत तक्रार

    15-Apr-2026   
Total Views |
amravati girls
 
अमरावती :(Amravati Girls' Case)अमरावती जिल्ह्यात समाज माध्यमाद्वारे १८० मुलींचे ३५० पेक्षा जास्त अश्लिल व्हिडीओ तयार करून त्यांचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. राज्यसभा खा. अनिल बोंडे यांनी अमरावती पोलिस अधिक्षकांकडे याबाबतची तक्रार दाखल केली.
 
खा. अनिल बोंडे यांनी आपल्या तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यात बरेचशे व्हॉटस्अॅप, टेलिग्राम तसेच स्नॅपचॅट गृप तयार झालेले असून ते सर्व गृप उर्दू भाषेत आहेत. या गृपमध्ये अमरावती(Amravati Girls' Case) येथे शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींना शिक्षणाच्या नावाखाली समाविष्ट करण्यात येते. त्यानंतर त्यांचे नंबर काही मुस्लिम मुलांना देतात आणि ते त्या मुलींशी संपर्क साधून त्यांच्याशी मैत्री करतात. हे गृप चालवणारे लोक काही लिंक पाठवतात. त्यावर क्लिक केल्यावर अश्लिल व्हिडीओ आणि मेसेज येणे सुरु होते. त्यानंतर संबंधित लोक त्या मुला-मुलींना धमकावणे, वेगवेगळ्या हॉटेलमध्ये मुलींना बोलवून त्यांचे अश्लील व्हिडीओ तयार करणे आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे प्रकार सुरु आहेत.
 
एसआयटी स्थापन करून चौकशी करा
 
परतवाडा शहरातील एका युवकाने इंस्टाग्राम आणि टेलिग्रामवर तरुणी आणि महिलांचे अश्लील व्हिडीओ प्रसारित केल्याचा आरोप आहे. मोहम्मद अयान आणि मोहम्मद जोयान या दोन युवकांनी जवळपास १८० मुलींचे ३५० पेक्षा जास्त अश्लिल व्हीडीओ तयार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी एसआयटी स्थापन करून सखोल चौकशीची मागणी अनिल बोंडे यांनी केली आहे. (Amravati Girls' Case)
 
 
"हे प्रकरण उघडकीस आल्यावर पोलिस विभागाच्या महासंचालकांशी माझी चर्चा झाली असून मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणाची दखल घेतली. स्थानिक हिंदूत्ववादी संघटनांनी यावर मोठा रोष व्यक्त केला. खा. अनिल बोंडे यांनी याप्रकरणाचे पुरावे पोलिसांकडे दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेऊन नराधमांवर कारवाई करणार आहे. अमरावतीमध्ये अशा घटना होणे हा संवेदनशील विषय असून सरकारला याचे गांभीर्य आहे. त्यामुळे याप्रकरणी मोठी यंत्रणा लावून चौकशी करणार आहे."
- महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....