नाशिक : (Ashok Kharat case) भोंदू अशोक खरात प्रकरणात मंगळवार दि. १४ एप्रिल रोजी नाशिक सत्र न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली असून न्यायालयाने आरोपीला चौथ्या गुन्ह्याप्रकरणी १८ एप्रिलपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी सुरू असताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने काही काळ सुनावणी थांबवावी लागली. न्यायालयातील आवाज आरोपीपर्यंत पोहोचत नसल्याने पोलिसांनी तत्परता दाखवत महिला पोलीस अधिकाऱ्याच्या मोबाईलवरून व्हिडीओ कॉल करून खरातशी संपर्क साधला आणि त्यानंतर पुन्हा सुनावणी सुरू करण्यात आली. न्यायाधीशांनी आरोपीला पोलिसांविरोधात काही तक्रार आहे का, असा प्रश्न विचारला असता त्याने नकारार्थी उत्तर दिले. (Ashok Kharat case)
सरकारी वकिलांचा गंभीर दावा
सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितले की, आरोपी महिलांना पाणी किंवा पेढे देत असे, त्यामध्ये गुंगीचे औषध मिसळले जात असल्याचा संशय आहे. “मी देवाचा अवतार आहे” असे सांगून महिलांना फसवले जात होते. माझ्याशी संबंध ठेवल्याने तू पवित्र झाली आहेस,” असे सांगून महिलांची फसवणूक केल्याचा आरोपही करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी देणे आवश्यक असल्याचे सरकारी वकिलांनी ठामपणे मांडले. दुसरीकडे, बचाव पक्षाच्या वकिलांनी याला विरोध करत याच मुद्द्यांवर आधीच तपास झाला असून पुन्हा कोठडी देण्याची गरज नसल्याचा युक्तिवाद केला. मात्र, अनेक महिलांचा समावेश असल्याने आणि प्रत्येक प्रकरण वेगळे असल्याने सखोल चौकशी आवश्यक असल्याचे मान्य करत न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केली. (Ashok Kharat case)
दरम्यान, या प्रकरणात आरोपीची पत्नी कल्पना खरात अद्याप फरार असून तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे. तिच्या नातेवाईक, मित्रमैत्रिणी तसेच घरातील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे. याशिवाय समता पतसंस्थेतील आर्थिक व्यवहारांचाही तपास सुरू असून अनेक खात्यांमध्ये संशयास्पद हालचाली आढळल्याचे समोर आले आहे. काही खाती बनावट कागदपत्रांच्या आधारे उघडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून संबंधितांनी आपल्या कागदपत्रांचा गैरवापर झाल्याचा दावा केला आहे. आरोपीच्या सासू पार्वती शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना “मला या सर्व प्रकाराची काहीच माहिती नाही, कल्पना कुठे आहे हेही माहित नाही,” असे सांगत हात झटकले आहेत. (Ashok Kharat case)
एकूणच, अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीचे आणि गंभीर होत असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठे आणि धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपास यंत्रणा या प्रकरणातील प्रत्येक पैलू तपासत असून आरोपीकडून अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलीस कोठडी निर्णायक ठरणार असल्याचे मानले जात आहे. (Ashok Kharat case)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.