मुंबई : (Mazagon Dock Colombo deal) भारतीय सागरी धोरणात मोठा बदल घडवणारा निर्णय समोर आला आहे. माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) ने श्रीलंकेतील कोलंबो डॉकयार्ड पीएलसी मध्ये तब्बल ५१% हिस्सा खरेदी करत आपला पहिला आंतरराष्ट्रीय करार जाहीर केला आहे. या व्यवहाराची किंमत सुमारे २४९ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. (Mazagon Dock Colombo deal)
हा करार केवळ व्यावसायिक नाही, तर भारताच्या सागरी आणि सामरिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. विशेषतः चीनचा हिंदी महासागरातील वाढता प्रभाव लक्षात घेता, भारताने उचललेलं हे पाऊल ‘गेम-चेंजर’ ठरू शकतं. (Mazagon Dock Colombo deal)
कोलंबो बंदराचं महत्त्व...
कोलंबो बंदर हे आंतरराष्ट्रीय सागरी व्यापाराचं प्रमुख केंद्र मानलं जातं. दररोज मोठ्या प्रमाणात जहाजांची ये-जा इथून होते. अशा ठिकाणी भारताची उपस्थिती म्हणजे हिंदी महासागरात मजबूत पाय रोवण्यासारखंच आहे. (Mazagon Dock Colombo deal)
गेल्या काही वर्षांत चीनने श्रीलंका आणि आसपासच्या देशांमध्ये गुंतवणूक करत आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र भारताने मुत्सद्दीपणे संबंध सुधारत आणि सामरिक गुंतवणूक वाढवत त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. (Mazagon Dock Colombo deal)
भारताला या करारामुळे भविष्यात सागरी मोहिमांसाठी मोठा फायदा होणार आहे. जहाज दुरुस्ती, लॉजिस्टिक सपोर्ट, इंधन पुरवठा आणि तांत्रिक सहाय्य या सर्व गोष्टी आता अधिक सुलभ होणार आहेत. विशेषतः हिंदी महासागरात भारतीय नौदलाची उपस्थिती अधिक मजबूत होईल. (Mazagon Dock Colombo deal)
२०१४ नंतर संरक्षण क्षेत्रात स्वावलंबनावर भर देत भारताने मोठी झेप घेतली आहे. युद्धनौका, पाणबुड्या आणि विध्वंसक जहाजांच्या निर्मितीत MDLने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. (Mazagon Dock Colombo deal)
तज्ज्ञांच्या मते, हा करार भारतासाठी केवळ आर्थिक नाही, तर सामरिकदृष्ट्याही मोठा विजय आहे. यामुळे भविष्यात भारताची सागरी ताकद आणि प्रभाव आणखी वाढणार आहे. (Mazagon Dock Colombo deal)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.