US Iran war : चर्चा निष्फळ! अमेरिकेचा इराणवर समुद्री वेढा; ट्रम्प प्रशासनाकडून होर्मुझच्या नाकेबंदीचा आदेश

    13-Apr-2026   
Total Views |

US Iran war

मुंबई : (US Iran war) युद्धविरामानंतर अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये शांतता चर्चा पार पडली. या बैठकीत तिन्ही देशांची शिष्टमंडळे सहभागी झाली होती. २१ तास सुरु असलेल्या चर्चेतून कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. ही चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आता अमेरिका-इराण युद्ध पुन्हा भडकण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.(US Iran war)
 
अमेरिकेचा इराणवर समुद्री वेढा

चर्चेदरम्यान सर्वात महत्त्वाच्या अणु कार्यक्रमाच्या मुद्द्यावर सहमती झाली नसल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमांवर सांगितले आहे. होर्मुझ सामुद्रधुनीत टोल देणाऱ्या जहाजांना रोखण्याची प्रक्रिया अमेरिकी नौदल सुरू करेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय तेलपुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या परिस्थितीसाठी इराणचा पवित्रा जबाबदार असल्याचंही त्यांनी नमूद केले.(US Iran war)
 
अशा प्रकारचा दबाव सहन करणार नाही

इराण जबरदस्तीने वसुली करत असल्याचा आरोप करत, कोणताही देश अशा प्रकारचा दबाव सहन करणार नाही, असे ट्रम्प म्हणाले. इराण किंवा इतर कोणत्याही पक्षाकडून अमेरिका किंवा शांततापूर्ण जहाजांवर हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच अमेरिका पूर्णपणे सज्ज असून, आवश्यकता भासल्यास लष्करी कारवाई करण्यासही तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. समुद्री सुरुंग हटवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.(US Iran war)

इराण आणि अमेरिकेतील वाटाघाटी का फिस्कटल्या?

दोन्ही देशांमध्ये पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे तब्बल २१ तास चर्चा झाली. अमेरिकेने इराणला आपला सर्वोत्तम प्रस्ताव दिला होता, मात्र इराणने तो नाकारला. इराणने अण्वस्त्र क्षमता न ठेवणे, हुती आणि हिजबुल्लासारख्या संघटनांना पाठिंबा न देणे आणि होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण हटवणे या अमेरिकेच्या प्रमुख अटी होत्या. मात्र, गोठवलेला निधी परत देण्याच्या बदल्यातही इराणकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.(US Iran war)
 
अमेरिकेच्या 'अवाजवी मागण्यां'मुळे चर्चा निष्फळ
 
दुसरीकडे, अमेरिकेच्या अवास्तव मागण्यांमुळे चर्चा निष्फळ ठरल्याचे इराणच्या सरकारी माध्यमांनी म्हटले आहे. लेबनॉनवरील हल्ले तात्काळ थांबवणे, युद्धातील नुकसानभरपाई, गोठवलेली संपत्ती मुक्त करणे, युरेनियम संवर्धनाचा पूर्ण अधिकार आणि होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण राखणे या इराणच्या अटी होत्या, ज्या अमेरिकेने नाकारल्या.१९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर दोन्ही देशांमध्ये अशा प्रकारची उच्चस्तरीय चर्चा प्रथमच झाली होती. या पार्श्वभूमीवर परिस्थिती निवळण्यासाठी रशियाने मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे.(US Iran war)

 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\