मुंबई : (Asha Bhosle Passes Away) आपल्या जादुई आवाजाने अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे रविवार, दि. १२ एप्रिल रोजी निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. सात दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या सुरांनी चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं. मात्र हा प्रवास अत्यंत संघर्षमय होता. करिअरच्या सुरुवातीच्या ९-१० वर्षांनंतर मिळालेल्या मोठ्या संधीचं सोनं करत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि नंतर कधीही मागे वळून पाहिलं नाही. अशा आशाताईंना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. (Asha Bhosle Passes Away)
भक्तिगीत, भावगीत, नाट्यसंगीत, गझल, शास्त्रीय, पॉप, लोकगीत अशा विविध प्रकारांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला. मराठी, हिंदी, बांगला यांसह २० पेक्षा अधिक भाषांमध्ये त्यांनी सुमारे १२,००० हून अधिक गाणी गायली. ‘तोरा मन दर्पण कहलाए’ पासून ‘खल्लास’सारख्या गाण्यांपर्यंत त्यांचा आवाज प्रत्येक पिढीला भावला. त्यांना पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषणसह अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. (Asha Bhosle Passes Away)
मुख्यमंत्र्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं की, “मंगेशकर घराण्यातील लता मंगेशकर यांच्यानंतर आणखी एक तारा निखळला आहे. आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. त्यांच्या जाण्याने सुरांची सुंदर बाग उजाड झाली.” (Asha Bhosle Passes Away)
त्यांनी पुढे सांगितले की, “अलीकडेच एका कार्यक्रमात त्यांनी ‘अभी ना जाओ छोड़कर’ हे गाणं माझ्याकडून गाऊन घेतलं होतं. त्यांचा तो सहवास आता लाभणार नाही, ही कल्पनाही करवत नाही.” (Asha Bhosle Passes Away)
तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्या ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादिदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली. आशाताईंचा आवाज म्हणजे… pic.twitter.com/pAcDLxeXqo
मुख्यमंत्र्यांनी आशा भोसले यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत, “देशभरातील चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत,” असेही म्हटले. (Asha Bhosle Passes Away)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.